Monday, October 14, 2024 02:03:48 AM

AAP
आम आदमी पक्ष संकटात

ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली दारू परवाना घोटाळ्यातून मिळवलेल्या पैशांचा गोवा निवडणुकीसाठी अफरातफर केल्याचा आरोप आम आदमी पक्षावर अर्थात 'आप'वर केला आहे.

आम आदमी पक्ष संकटात

नवी दिल्ली : ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने दिल्ली दारू परवाना घोटाळ्यातून मिळवलेल्या पैशांचा गोवा निवडणुकीसाठी अफरातफर केल्याचा आरोप आम आदमी पक्षावर अर्थात 'आप'वर केला आहे. या प्रकरणात ईडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात अरविंद केजरीवाल यांना आरोपी क्रमांक ३७ आणि 'आप'ला आरोपी क्रमांक ३८ करण्यात आले आहे. पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पक्षाला ईडीने आरोपी केले आहे. 

ईडीने २३२ पानांचे आरोपपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. यात दारू व्यावसायिकांशी संगनमत करून दारू घोटाळ्यातून 'आप'साठी लाच स्वरुपात १०० कोटी रुपयांची कमाई करण्यात आल्याचा आरोप आहे. 'आप'ने १०० कोटींपैकी ४५ कोटी रुपये गोवा विधानसभा निवडणुकीत वापरण्यासाठी हवालाद्वारे पाठवले, असाही आरोप ईडीने केला आहे. यासाठी पुरावा म्हणून व्हॉट्सअॅप चॅट सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास 'आप'ची मान्यता रद्द होऊ शकते. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo