मुंबई : मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांचे ताजे ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमधून त्यांनी नाना पटोले यांना टोला मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झालेले नाना नंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. काही महिन्यांनी त्यांनी विधानसभेतील अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पटोलेंच्या राजीनाम्यानंतर काही महिन्यांतच उद्धव सरकार अल्पमतात आले. उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करण्याऐवजी राजीनामा दिला. या घटनेची आठवण करुन देत शेलारांनी कवितारुपी ट्वीट करुन पटोलेंना टोला मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.