इस्लामाबाद : भारतासोबतच्या अलीकडच्या संघर्षात पाकिस्तानचे नेतृत्व केल्याबद्दल पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली आहे. ही माहिती पाकिस्तानच्या सरकारी टेलिव्हिजन चॅनेलने शेअर केली आहे.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली घेतलेला निर्णय
वृत्तानुसार, जनरल मुनीर यांना बढती देण्याचा निर्णय पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या पदोन्नतीमुळे, जनरल मुनीर यांना पाकिस्तानी सैन्यात एक महत्त्वाचे पद मिळाले आहे, ज्यामुळे देशाच्या सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींमध्ये त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची बनते.
या पदोन्नतीनंतर जनरल मुनीर यांच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या आहेत आणि त्यांना पाकिस्तानी सैन्याच्या कारवायांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले आहेत. हे पाऊल पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते, जे देशाच्या सुरक्षा धोरणावर आणि प्रादेशिक स्थिरतेवर परिणाम करू शकते.
हेही वाचा - मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडच्या जवळचा दहशतवादी अबू सैफुल्लाह पाकिस्तानात ठार
पाकिस्तानी लष्कराने कधीही आपल्या इस्लामिक पाळा-मुळांबद्दल संकोच दाखवला नाही. पाकिस्तानी सैन्याने भारताविरुद्ध अलीकडेच केलेली 'बुन्यान उल मरसूस' ही कारवाई याचे ताजे उदाहरण आहे. ते कुराणातील एका आयतीतून घेतले आहे. याबद्दल विचारले असता, पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग आयएसपीआरचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ म्हणाले की, इस्लाम हा केवळ सैनिकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग नाही तर, तो सैन्याच्या प्रशिक्षणाचा देखील एक भाग आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या कबुलीमुळे गणवेशधारी दल आणि जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबार सारख्या गैर-गणवेशधारी जिहादींमधील संबंध संपुष्टात आले आहेत. यावेळी ते म्हणाले की, आपल्याकडे एक लष्करप्रमुख आहेत ज्यांचा यावर दृढ विश्वास आहे.
अहमद शरीफ पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांच्याबद्दल बोलत होते. असीम मुनीरला कट्टरपंथी इस्लामिक विचारसरणीतून प्रेरणा मिळाल्यामुळे 'मुल्ला जनरल' म्हणूनही ओळखले जाते. दक्षिण आशियाच्या भू-राजकीय दृश्यावर पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख असीम मुनीर याच्यासारखे वादग्रस्त किंवा धार्मिकदृष्ट्या प्रेरित व्यक्तिमत्त्व फार कमी आहे. खोल धार्मिक श्रद्धेचा माणूस असलेल्या मुनीरने केवळ लष्करी नेता म्हणूनच नव्हे तर, धार्मिक नेता म्हणूनही प्रतिमा निर्माण केली आहे.
व्यावसायिक कार्यपद्धतीऐवजी जिहादी जनरल
लष्करी पत्रकार परिषदेत आणि ऑपरेशन मॉनिटरिंग दरम्यान तो ज्या पद्धतीने वारंवार कुराणातील संदर्भ देतो, त्यावरून तो एका व्यावसायिक लष्करी अधिकाऱ्यापेक्षा एक जिहादी कमांडर म्हणून अधिक ओळखला जातो. मात्र, टीकाकारांचे म्हणणे आहे की, जनरल मुनीर धार्मिक भाषणात फर्डा वक्ता असलेला मुनील याउलट, धोरणात्मकदृष्ट्या कमकुवत आहे. भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षात त्याची कमजोरी उघड झाली. जनरल मुनीर यांनी धार्मिक उपदेशकाप्रमाणे सैनिकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताच्या लष्करी ताकदीपुढे आणि तांत्रिक फायद्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला.
असीम मुनीरने सैन्य कमकुवत केले
पाकिस्तानमधील अनेकांना असे वाटते की, जनरल मुनीर यांनी धार्मिक प्रतीकांमध्ये राष्ट्रवाद मिसळला आहे, ज्यामुळे सैन्याची शिस्त कमकुवत होते. लष्करी संवादात धार्मिक भाषेचा वाढता वापर हा एक नवीन धोका दर्शवितो. असं वातावरण निर्माण केलं जात आहे, जिथे असंतोषाला इस्लामविरोधी घोषित करून दडपता येईल. खरं तर अशा व्यक्तीला पदावरून हटवले जाईल, अशी शक्यता वाटत होती. अशा चर्चाही होत्या. मात्र, आता या मुनीरला बढती मिळाल्यामुळे पाकिस्तानी सरकारला लष्करावर काहीही नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याचे दिसते. तसेच, पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्याची वाटचाल आणखी खोल दरीच्या दिशेने होत असल्याचा अंदाज येतो. जिहादच्या मूर्ख कल्पनांसाठी आणखीही काही काळ वेठीला बांधले जाणे पाकिस्तानच्या नशीबात असल्याचेही दिसते.
हेही वाचा - ट्रम्प भारतीयांसाठी ठरणार खिसेकापू! आता आणले 'द वन बिग ब्यूटीफुल बिल'