Sunday, May 10, 2026 08:28:35 PM

Assam Election Result 2026 : आसाममध्ये पुन्हा एकदा 'हिमंत' पर्व; तब्बल 91 जागांवर आघाडीसह भाजपची विजयाकडे घोडदौड, काँग्रेस पिछाडीवर

भाजपला आसामध्ये मोठे बहुमत मिळेल असे स्पष्ट दिसत आहे. याउलट, विरोधी पक्ष असलेला काँग्रेस मोठ्या फरकाने पिछाडीवर आहे.

assam election result 2026  आसाममध्ये पुन्हा एकदा हिमंत पर्व तब्बल 91 जागांवर आघाडीसह भाजपची विजयाकडे घोडदौड काँग्रेस पिछाडीवर

Assam Election Result 2026 : आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत सत्ताधारी भाजपने अभूतपूर्व आघाडी घेतली आहे. पहिल्या काही तासांच्या कलांमध्ये भाजपने तब्बल 91 जागांवर आघाडी मिळवत सत्तास्थापनेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. भाजप येथे सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान जागांपेक्षाही खूप पुढे आहे. यामुळे भाजपला आसामध्ये मोठे बहुमत मिळेल असे स्पष्ट दिसत आहे. याउलट, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ 28 जागांसह पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचा करिष्मा या निवडणुकीतही कायम असल्याचे निकालांवरून स्पष्ट होत असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपची पकड मजबूत झाली आहे.

विजयी उत्साहात भाजप मुख्यालयात जल्लोष
राज्यातील सुरुवातीचे ट्रेंड भाजपच्या बाजूने येताच दिल्लीतील भाजप मुख्यालयात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आसामसह इतर 5 राज्यांच्या निकालांकडे देशाचे लक्ष लागलेले असताना, आसाममधील भाजपची कामगिरी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करणारी ठरली आहे. सत्तेत पुन्हा एनडीएचेच पुनरागमन होईल, असा विश्वास पक्षाच्या गोटातून व्यक्त केला जात आहे. तसेच, यंदाच्या निवडणुकीत बंगालमध्येही भाजपला मोठी आशा निर्माण झाली आहे.

मतदानाची टक्केवारी आणि उमेदवारांचे भवितव्य
आसाममधील 35 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 40 मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही प्रक्रिया पार पडत आहे. यावेळच्या निवडणुकीत 126 जागांसाठी एकूण 722 उमेदवारांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. विशेष म्हणजे, 9 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात 85.96 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. हा विक्रमी मतदानाचा टक्का भाजपसाठी निर्णायक ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - West Bengal Election Result 2026: अमित शाहांनी म्हटलं आणि करून दाखवलं! बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या साम्राज्याला धक्का

स्थानिक नेत्यांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह
मतमोजणी सुरू असतानाच विविध मतदारसंघांतील उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. नौबोइचा मतदारसंघातील एजीपी उमेदवार बसंत दास यांनी आपला विजय 100 टक्के निश्चित असल्याचे सांगत राज्यात पुन्हा हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, असा दावा केला. प्रशासनाने मतमोजणीसाठी चोख व्यवस्था ठेवली असून, कार्यकर्त्यांनी निकाल अधिकृत जाहीर होण्यापूर्वीच विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आहे.

विरोधी पक्षांची स्थिती आणि राजकीय दिशा
निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंनी पूर्ण ताकद लावली होती. मात्र, सद्यस्थितीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार दिसत असून त्यांना केवळ 9 ते 19 जागांच्या दरम्यान आघाडी मिळवता आली आहे. आसामची ही निवडणूक राज्याची पुढील 5 वर्षांची राजकीय दिशा ठरवणारी आहे. जरी अंतिम निकाल येणे बाकी असले, तरी सुरुवातीच्या कलानुसार भाजपने आसाममध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले असून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.

Assam Election Key Leaders : आसाममध्ये या दिग्गज नेत्यांवर सर्वांची नजर
या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते मैदानात असून त्यांच्यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे
- हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) हे विद्यमान मुख्यमंत्री असून एनडीएचा मुख्य चेहरा आहेत.
- गौरव गोगोई (Gaurav Gogoi) हे काँग्रेसचा प्रमुख चेहरा आहेत.
- बद्रुदिन अजमल (Badruddin Ajmal) हे एआययूडीएफ प्रमुख असून यांचा लोअर आसाममध्ये प्रभाव आहे.
- अखिल गोगोई (Akhil Gogoi) हे रायजोर दल नेते असून हा आंदोलनातून उभा राहिलेला चेहरा आहे.

हेही वाचा - Kearalam Election Result 2026: केरळमध्ये काँग्रेसची 'लाट'! 96 जागांवर आघाडी घेत UDFची ऐतिहासिक घोडदौड, डाव्या आघाडीची सत्ता धोक्यात?


सम्बन्धित सामग्री