बीड : दसऱ्यानिमित्त घेतलेल्या विशेष मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी वंचितांवरचे हल्ले खपवून घेणार नाही असा इशारा दिला. झुंडशाही करणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी थेट इशारा दिला. या मेळाव्याला मुंडे बहीण भाऊ आणि लक्ष्मण हाके एकाच मंचावर होते. भाजपाच्या पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके उपस्थित होते. बीड जिल्ह्यात दरवर्षी दसऱ्यानिमित्त होणाऱ्या मेळाव्याला अलोट गर्दी होते. अठरापगज जातीचे नागरिक उपस्थित असतात. आमंत्रण न देता हे नागरिक उत्साहाने येतात. या नागरिकांची जबाबदारी माझी आहे. गोपीनाथ मुंडे यांनी अखेरचा श्वास घेण्याआधी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आता राज्याचा दौरा करणार आहे. वंचितांवर अन्याय करणाऱ्यांना जाब देण्यास भाग पाडणार. वंचितांचे जीवन सुरक्षित आणि सुसह्य करेपर्यंत थांबणार नाही; असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
आर्यमन आला व्यासपीठावर
पंकजा मुंडे यांनी दसऱ्याच्या निमित्ताने घेतलेल्या सभेत मुलगा आर्यमन याला जनतेसमोर आणले. त्याची ओळख करुन दिली. यामुळे भविष्यात आर्यमन राजकारणात दिसणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
'वंचितांवरचे हल्ले खपवून घेणार नाही'
पंकजा मुंडेंचा झुंडशाही करणाऱ्यांना थेट इशारा
मुंडेंनी मेळाव्यात घेतली भूमिका
बीडच्या राजकारणात जनतेसमोर आली तिसरी पिढी
पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमन आला व्यासपीठावर