२८ सप्टेंबर, २०२४, धुळे : एमआयएमच्या आमदार फारुक शहा यांच्याकडून औरंग्याच्या समाधीवर फुल अर्पण करण्यात अली आहेत. त्यामुळे फारुक शहा टिकेचे धनी ठरत आहेत. आमदार शाह यांच्यावर समाज माध्यमावर टीका होत आहे. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावर निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत आहेत. हा विडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असल्याचा दिसून येत आहे. मात्र, याबाबत आमदारांनी प्रतिक्रिया देत असताना धार्मिक स्वातंत्र्य देशांमध्ये असून, धार्मिक आस्था वर कोणी बंधन घालू शकत नाही. त्यामुळे आपण तिकडे गेल्याच आमदारांनी सांगितले आहे. औरंगजेबाच्या समाधी वरत फुल अर्पण करण्याचं त्यांनी समर्थन केला असून, टीकाकारांच्या प्रतिक्रिया बोलणे त्यांनी टाळले आहे.