Affordable Diesel Cars : भारतीय बाजारपेठेत आजही डिझेल कारची क्रेझ कायम आहे, विशेषतः अशा ग्राहकांसाठी ज्यांना अधिक टॉर्क, दमदार पॉवर आणि इंधनाची बचत हवी असते. जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी अनेकदा जावे लागत असेल किंवा एकाच वेळ सर्वांना जावे लागत असेल, तर तशा गरजा पूर्ण करणाऱ्या चारचाकींचे खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. अशा गरजांसाठी शक्यतो एखाद्या दणकट 7-सीटर कारला पसंती दिली जाते. महिंद्रा आणि टाटा सारख्या देशी कंपन्या अशा कार तयार करण्यासाठी ओळखल्या जातात. या कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व राखले आहे. सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या काही किफायतशीर आणि लोकप्रिय डिझेल SUV गाड्यांची माहिती घेऊया.
महिंद्राचा स्वस्त आणि दणकट पर्याय: बोलेरो सिरीज
भारतात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero) ही सर्वात लोकप्रिय आणि परवडणारी कार मानली जाते. याची सुरुवातीची किंमत जवळपास 9.28 लाख रुपये आहे. यामध्ये 1.5 लिटर mHawk डिझेल इंजिन असून ते 75 BHP पॉवर देते आणि 16 km/l चा मायलेज प्रदान करते. जर तुम्हाला थोडे आधुनिक फीचर्स हवे असतील, तर तुम्ही Bolero Neo चा विचार करू शकता. याची किंमत 9.43 लाख रुपयांपासून सुरू होते. 100 BHP पॉवर आणि 17 km/l मायलेज देणारी ही कार एलईडी टेललाईट्स आणि टचस्क्रीन सारख्या आधुनिक सोयींनी सज्ज आहे, मात्र ऑफ-रोडिंगसाठी क्लासिक बोलेरोच सरस ठरते.
टाटा सफारी: स्टाईल आणि सुरक्षिततेचा संगम
टाटा सफारी (Tata Safari) ही गाडी भारतीय रस्त्यांवर अनेक वर्षांपासून राज्य करत आहे. तिची सुरुवातीची किंमत 14.66 लाख रुपये असून यात 2.0 लिटरचे क्रियोटेक डिझेल इंजिन मिळते. हे इंजिन 170 BHP पॉवर आणि 350 NM टॉर्क निर्माण करते. सफारीमध्ये तुम्हाला पॅनोरॅमिक सनरूफ, 12.3 इंच टचस्क्रीन आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखी प्रीमियम फीचर्स मिळतात. सुमारे 16.3 km/l चा मायलेज देणारी ही SUV मोठ्या कुटुंबासाठी एक आरामदायी आणि स्टायलिश पर्याय आहे.
हेही वाचा - Mozilla Firefox Hacking Threat: सावधान! लाखो इंटरनेट वापरकर्त्यांना हॅकिंगचा धोका; भारत सरकारकडून 'हाय अलर्ट' जारी
महिंद्रा स्कॉर्पिओ: क्लासिक आणि 'N' चा धमाका
महिंद्राची स्कॉर्पिओ क्लासिक (Scorpio Classic) आजही आपल्या आक्रमक लूकसाठी ओळखली जाते. या गाडीची किंमत 13.03 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 2.2 लिटर इंजिन असून ते 130 BHP पॉवर देते. दुसरीकडे, अधिक आधुनिक तंत्रज्ञान आणि ADAS सारखे सेफ्टी फीचर्स हव्या असलेल्या ग्राहकांसाठी Scorpio N उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत 13.61 लाख रुपये आहे. स्कॉर्पिओ N चे इंजिन 200 BHP पर्यंत पॉवर निर्माण करते. ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी यामध्ये 4x4 चा पर्याय देखील उपलब्ध आहे.
महिंद्रा XUV700: तंत्रज्ञान आणि लक्झरीचा अविष्कार
जर तुमचे बजेट 14.18 लाख रुपयांच्या आसपास असेल, तर Mahindra XUV700 ही एक उत्कृष्ट प्रीमियम निवड ठरू शकते. यामध्ये 2.2 लिटर डिझेल इंजिन असून ते 200 BHP ची अफाट पॉवर देते. लेव्हल-2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि पॅनोरॅमिक सनरूफ ही या कारची प्रमुख आकर्षणे आहेत. याशिवाय, ज्यांना फक्त 5-सीटर डिझेल कार हवी आहे, त्यांच्यासाठी Kia Sonet आणि Tata Altroz हे देखील चांगले पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर; विमानात ‘गगन’ प्रणाली नव्हती? फक्त 28 दिवसांनी..