Electric Cars 2026 : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) बाजारपेठ वेगाने विस्तारत असून, 2026 हे वर्ष ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः 20 लाख रुपयांच्या बजेटमध्ये अनेक शक्तिशाली आणि जास्त मायलेज देणाऱ्या कार भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज आहेत. मारुती, टोयोटा आणि टाटा यांसारख्या दिग्गज कंपन्या या शर्यतीत आघाडीवर आहेत.
1. मारुती सुझुकी ई-विटारा (Maruti Suzuki e-Vitara)
मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक कार असून ती फेब्रुवारी 2026 मध्ये लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. ही कार हुंडई क्रेटा ईव्ही आणि टाटा कर्व्ह ईव्हीला तगडी टक्कर देईल.
रेंज: या कारमध्ये 49 kWh आणि 61 kWh असे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळतील. यातील मोठ्या बॅटरी पॅकसह ही कार एका चार्जमध्ये तब्बल 543 किलोमीटरची रेंज देईल.
किंमत: अंदाजे 17 ते 22.50 लाख रुपये.
2. टोयोटा अर्बन क्रूझर एबेला (Toyota Urban Cruiser Ebella)
टोयोटा आणि मारुती यांच्या भागीदारीतून विकसित झालेली 'एबेला' ही टोयोटाची भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. याचे डिझाइन स्लीक एलईडी हेडलाइट्स आणि अत्याधुनिक इंटिरिअरसह अत्यंत प्रीमियम असेल.
रेंज: मारुती ई-विटाराप्रमाणेच यातही 61 kWh ची बॅटरी असेल, जी 543 किलोमीटरचा पल्ला गाठण्यास सक्षम आहे.
लॉन्च: 19 जानेवारी 2026 रोजी ही कार सादर केली जाण्याची शक्यता आहे.
3. टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट (Tata Punch EV Facelift)
टाटा मोटर्सची अत्यंत लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही 'पंच' आता नवीन अवतारात येत आहे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी याचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च होऊ शकते.
रेंज: यामध्ये दोन प्रकार असतील - 25 kWh (रेंज 265 किलोमीटर) आणि 35 kWh (रेंज 365 किलोमीटर).
वैशिष्ट्ये: नवीन एअरपॅड्स, मोठी टचस्क्रीन आणि अपडेटेड सेफ्टी फिचर्स.
हेही वाचा - Top 5 Electric Scooters : इलेक्ट्रिक स्कूटरवर 'लाईफटाईम' वॉरंटी! बॅटरीच्या टेन्शनमधून ग्राहकांची कायमची सुटका; 'या' 5 कंपन्यांच्या जबरदस्त ऑफर्स
4. टाटा सिएरा ईव्ही (Tata Sierra EV)
टाटाचा आयकॉनिक 'सिएरा' ब्रँड आता इलेक्ट्रिक रूपात पुन्हा एकदा लोकांच्या भेटीला येत आहे. 2026 च्या पहिल्या सहामाहीत ही कार लॉन्च होण्याची शक्यता असून ती Acti.EV+ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
रेंज: यात 55 kWh आणि 65 kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता असून रेंज 450 ते 500 किलोमीटरदरम्यान असेल.
विशेष: यामध्ये AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) ची सुविधाही दिली जाऊ शकते.
5. किआ सायरोस ईव्ही (Kia Syros EV)
किआ इंडिया आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'सायरोस'चे इलेक्ट्रिक व्हर्जन 2026 च्या सुरुवातीलाच बाजारात उतरवणार आहे. ही कार प्रामुख्याने शहरी वापरासाठी अत्यंत सोयीस्कर असेल.
रेंज: यात 42 kWh आणि 49 kWh बॅटरी पर्याय असतील, ज्याची रेंज साधारणपणे 300 ते 355 किलोमीटरच्या दरम्यान असेल.
वैशिष्ट्ये: पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 ADAS.
हेही वाचा - Electric Scooter : पेट्रोलचा खर्च विसरा! एका चार्जमध्ये 320 किमीपर्यंत धावणाऱ्या 'या' 5 जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत अन् फीचर्स