Monday, February 10, 2025 06:13:51 PM

Awhad read history reply from Ramgiri Maharaj
'अहो आव्हाड, इतिहास वाचा' म्हणत रामगिरी महाराजांचं प्रतिउत्तर

'अहो आव्हाड, इतिहास वाचा' 'आव्हाड मूर्ख माणूस' रामगिरी महाराज आव्हाडांवर संतापले

अहो आव्हाड इतिहास वाचा म्हणत रामगिरी महाराजांचं प्रतिउत्तर

छत्रपती संभाजीनगर:  जिल्ह्यात महंत रामगिरी महाराजांनी जन-गण-मन नाही तर वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रगीत हवे होते अशा आशयाचे वक्तव्य केल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराजांना जोड्याने मारला पाहिजे अशी टोकदार टीका केल्यानंतर यावर रामगिरी महाराजांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलंय. 'अहो आव्हाड, इतिहास वाचा'  'आव्हाड मूर्ख माणूस' असे म्हणत रामगिरी महाराजांनी आव्हाडांना प्रतिउत्तर दिलय. 

काय म्हणाले रामगिरी महाराज? 
आपण लॉन्चिंगच्या अगोदर राष्ट्रगीतासाठी उभं राहिलो. या राष्ट्रगीताचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती परंतु हे गीत रविंद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहिलं होतं. अशा गीताला आपलं राष्ट्रगीत मानणं योग्य नाही, यात बदल व्हायला हवा, असं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलं आहे. वंदे मातरम हेच आपले राष्ट्रगीत व्हावं, असं वक्तव्य महंत रामगिरी महाराज यांनी केलं आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड? 
रामगिरी महाराजांना जोड्याने मारला पाहिजे अशी टोकदार टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर केली. 

काय आहे रामगिरी महारांचे प्रतिउत्तर? 
'अहो आव्हाड, इतिहास वाचा'  'आव्हाड मूर्ख माणूस' असे म्हणत रामगिरी महाराजांनी आव्हाडांना प्रतिउत्तर दिलय. 

दरम्यान मिशन अयोध्या चित्रपटाचे लॉन्च दिनांक  24 जानेवारी 2025 रोजी एकाच वेळी महाराष्ट्रात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रामगिरी महाराज यांनी उपस्थिती लावली होती. आणि याप्रसंगीच त्यांनी मनोगत व्यक्त करताना 'देशाचे राष्ट्रगीत 'जण-गण-मन' नाही तर वंदे मातरम पाहिजे' असं वक्तव्य केलं होत. 


सम्बन्धित सामग्री