Tuesday, December 10, 2024 11:01:18 AM

Baba Siddique
बाबा सिद्दिकींना बिष्णोईने खरंच मारलं असेल ?

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने स्वीकारल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली....मात्र खरंच बिष्णोई टोळीचाच या हत्येमागे हात आहे का ?

बाबा सिद्दिकींना बिष्णोईने खरंच मारलं असेल  

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देश हादरला....हल्ला करणाऱ्या तिघांपैकी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले....आता या प्रकरणात या तिघांव्यतिरिक्त अनेकांची नावे समोर येत आहे...आणि महत्त्वाचे म्हणजे या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने स्वीकारल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली....मात्र खरंच बिष्णोई टोळीचाच या हत्येमागे हात आहे का ?....की काही वेगळंच प्रकरण आहे...पाहुयात...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अनेक बाबी समोर येत आहेत. लॉरेन्स बिष्णोई टोळीने हत्येची जबाबदारी घेतली आहे...समाजमाध्यमांत शुभम लोणकरच्या शुभू लोणकर या अकाऊंटवरून ही पोस्ट टाकण्यात आली...बाबा सिद्दिकी हे दाऊदच्या जवळचे होते. आणि जे जे दाऊदच्या जवळ आहेत त्या सर्वांना संपवणार असं बिष्णोईने म्हंटलंय....
 
या पोस्टमध्ये काय आहे पाहुयात....

सलमान, आम्हाला भांडण नकोय.

पण तुझ्यामुळे आमचे नुकसान झाले आहे.

ज्या बाबा सिद्दिकीचे सध्या गुणगाण सुरु आहे,

तो एकेकाळी दाऊदचा साथीदार होता.

याच्या मृत्यूचे कारण अनुज थापन हे आहे.

त्याचबरोबर बॉलिवूड, राजकारण आणि बांधकाम व्यवसायात दाऊदचा हस्तक्षेप आम्हाला समोर आणायचा आहे.

आमचे कुणाशीही वैर नाही.

जो दाऊदला मदत करणार त्याने स्वत:चे दिवस मोजावेत.

सलमान खानच्या मित्रांनाही तोच नियम लागू आहे.

आम्ही खोडी काढणार नाही. मात्र, आमच्या साथीदाराला माराल तर, आम्ही उत्तर देऊच.

....................

सिद्दिकी यांच्या हत्येपूर्वी समाज माध्यमात संदेश प्रसारित करणाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आली. तर सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी शिवानंद उर्फ शिवा हा सुद्धा हा पुण्यात भाड्याने वास्तव्यास होता. पुण्यातील वारजे भागात भंगार गोळा करण्याचे काम करत होता. हत्येच्या आधी मुंबईत जाऊन त्याने पाहणी केली होती. अटकेत असलेल्या आरोपींना लोणकर बंधूंनी पुण्यात राहण्यासाठी मदत केल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण याला रविवारी पोलिसांनी अटक केली. शुभम पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. त्याचा भाऊ वारजे परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. 

..........

काही दिवासांपूर्वीच बाबा सिद्दिकींना धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिष्णोईवर संशय व्यक्त केला आहे. सिद्दिकींच्या खूनामागे बिष्णोईचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. बिष्णोई टोळीने देशात नाही तर विदेशात देखील अनेक हाय प्रोफाईल किलिंग केल्या आहेत. लॉरेन्स बिष्णोई हा कुख्यात गँगस्टर असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याने भारतातील अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या लोकांचा खून घडवून आणला आहे....बिष्णोई टोळीवरील आरोप आपण पाहुयात...

बिष्णोईवर खंडणी, खून, अमली पदार्थांची तस्करी यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दाऊदला टक्कर देत बिष्णोईने देशभरात आपलं जाळं विणलं. लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. त्याचा पंजाब आणि हरियाणामधील अनेक गुन्हेगारांशी जवळचा संबंध आहे. बिष्णोईने सलमान खानला अनेकवेळा धमकी दिली आहे. मुसेवालाच्या हत्येमागे बिष्णोई टोळीच असल्याचे तपासात उघड झाले आहे. 

बिष्णोई टोळी सलमान खानच्या मागे हात धुवून लागली आहे. त्याने सलमान खानला अनेकवेळा धमकी दिली आहे. याचबरोबर सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. एका व्यक्तीला सलमान खानचा खून करण्याचा कट रचल्याप्रकरणी २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याचं कनेक्शन हे बिष्णोईशी असल्याचं उघड झालं होतं. 

मुक्तसर येथील सरकारी कॉलेजमधील निवडणुकीत विजयी उमेदवाराची २०१३ मध्ये खून केल्याचा देखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर बिष्णोई गँगने दारू तस्करी आणि शस्त्र तस्करी या व्यवसायात आपले पाय पसरले. त्यांनी अनेक गुन्हेगारांना आश्रय आणि सुरक्षा देण्याचे काम सूरू केले. गोल्डी ब्रार गँगसोबत हातमिळवणी करून लॉरेन्स तिहार जेलमध्ये बसून आपली गँग चालवत आहे.

...........

बाबा सिद्दीकी आणि वाद

दाऊदशी संबंध असल्याचा आरोप

बॉलिवूड, बांधकाम व्यवसाय आणि दाऊदमधला दुवा असल्याचा आरोप

बेकायदा शस्त्र प्रकरणात अटकेत असलेल्या संजय दत्तचे अवास्तव समर्थन

एनआयएने बाबा सिद्दीकी यांची ४०० कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केल्याची सूत्रांची माहिती

...........

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून एक जण अजूनही फरार आहे. शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवाचा मुंबई पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे. . सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलिसांचे वेगवेगळे पथक वेगवेगळ्या राज्यात त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी आत्तापर्यंत हरियाणाचा रहिवासी गुरमेल बलजीत सिंग (23), उत्तर प्रदेशचा रहिवासी धर्मराज राजेश कश्यप (19) आणि पुण्याचा रहिवासी सह-सूत्रधार प्रवीण लोणकर या तीन आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणातील हँडलर मोहम्मद झिशान अख्तर याचा शोध सुरु आहे. तो उज्जैन आणि खांडवा येथे असू शकतो असा पोलिसांना संशय आहे. उत्तर प्रदेशचा रहिवासी शूटर शिवकुमार गौतमचा मध्य प्रदेशात शोध सुरु आहे. मुंबई पोलिसांचे पथक मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत. घटनेनंतर मध्य प्रदेशात तो पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे. 

या संपूर्ण प्रकरणात आता चौथ्या नावाचा समावेश झालंय..... झिशान अख्तर असं याचं नाव असून लॉरेन्स बिष्णोईने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी झिशान अख्तरवर दिली होते........

कोण आहे हा झिशान अख्तर पाहुयात....

सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी वाँटेड असलेला चौथा गुन्हेगार झिशान अख्तर

कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा हस्तक 

पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी

झिशानला 2022 मध्ये खून आणि खंडणीच्या प्रकरणात अटक

गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपीचं नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा चौथा आरोपी हा तीनही आरोपींना हँडल करत होता. हे चारही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र आले होते. त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट शिजला असल्याची माहिती मिळतेय. हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये हे आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात आले. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर आरोपींनी प्रत्येकी 50 हजार रुपये वाटून घ्यायचे असल्याचे ठरवले होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून एक मोठा खुलासा समोर आला आहे. बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी या दोघांनाही मारण्याचे आदेश होते. आरोपीची चौकशी सुरू असताना आरोपींनी ही मोठी कबुली दिली आहे. ‘संधी मिळताच दोघांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते’, अशी कबुली आरोपींकडून देण्यात आली असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सुरू असलेल्या आरोपींच्या चौकशीतून समोर आलेल्या खुलासा नंतर एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड स्टार सलमान खानच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली जात आहे. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र होते म्हणूनच त्यांची हत्या केल्याचं बिष्णोई गँगने स्पष्ट केलंय. त्यामुळे आता सलमानच्या जीवालाही धोका अधिकच वाढल्याचं दिसतंय. लॉरेन्स बिष्णोई गँग आणि सलमान खान यांच्यामधील वादाला कारणीभूत हे काळ्या हरणाची म्हणजे काळविटाची शिकार आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर प्रतिबंध असताना सलमानने हे कृत्य केल्याने तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. या प्रकरणी खटला चालून 2018 साली सलमान खानला पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. पण दोनच दिवसात तो 50 हजारांच्या जामीनावर बाहेर आला. यामुळे लॉरेन्स बिष्णोई गँग मात्र सलामान खानवर प्रचंड नाराज झाली. राजस्थानमधील बिष्णोई समाज हा निसर्गदेवतेला पूजणारा समाज मानला जातो. वृक्षतोड असो वा इतर पर्यावरणीय वाद असो, शेकडो वर्षांपासून हा समाज निसर्गाचा आदर करतो आणि त्याच्या विरोधातील कृत्यांच्या विरोधात ठामपणे उभा राहतो. 

काळे हरिण हे बिष्णोई समाजात पवित्र मानले जाते, त्याला देवाचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे सलमानने दोन काळ्या हरिणांची हत्या केल्यानंतर माफी मागावी अशी मागणी लॉरेन्स बिष्णोई यांने केली होती. पण सलमान खानने माफी मागितली नाही आणि त्यामुळेच लॉरेन्स बिष्णोई त्याच्या जीवावर उठला आहे. लॉरेन्स बिष्णोई यांने सलमान खानला अनेकदा उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्याच्या परिवारालाही जीवे मारायची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सलमानच्या घरावर गोळीबारही केला होता. काळ्या हरणाच्या शिकारीप्रकरणी सलमान खानला त्याचे मित्र बाबा सिद्दीकी यांनी मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सलमान खानला मदत करणाऱ्यांना मारले जाईल असं सांगत बिष्णोई गँगने बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या केल्याचं सांगितलं जातंय. 

मुंबईच्या बांद्रा भागातील प्रभावी नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा सिद्दीकी यांचा विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये सहभाग होता, ज्यामध्ये काही महत्त्वाचे एसआरए प्रकल्प समाविष्ट होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सिद्दीकींची भूमिका आणि मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात त्यांचा प्रभाव होता......त्यांच्या हत्येच्या दिवशी सिद्दीकी आपल्या मतदारसंघातून प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले गेले, मात्र त्यांनी आपले प्राण गमावले.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्प हे नेहमीच वादाचे केंद्र राहिले आहेत. शहरातील झोपडपट्टीतील लोकांसाठी घरे पुरवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या एसआरए योजनांमध्ये विकासकांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी असतात. या प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो....सिद्दीकी त्यांच्या मतदारसंघातील एका मोठ्या एसआरए प्रकल्पावर देखरेख करत होते. या प्रकल्पाभोवती धमक्या आणि भयपटांच्या अफवा अनेक महिन्यांपासून पसरल्या होत्या, ज्यामध्ये अनेक गट या जमिनीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते..... मुंबईतील रिअल इस्टेट माफिया, ज्याचे राजकीय आणि गुन्हेगारी नेटवर्कशी खोल संबंध आहेत, अनेकदा अशा वादांचा केंद्रबिंदू असतो. सिद्दीकींची या प्रकल्पातील भूमिका त्यांना लक्ष्य बनवू शकते का? काही अहवालांनुसार, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार आणि सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी आपल्या मतदारसंघातील एका एसआरए प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्याने वादंग उठला होता. ही गोष्ट लक्षात घेऊनही पोलीस तपास करीत आहे......


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo