Tuesday, December 10, 2024 11:53:58 AM

Baba Siddique Murder Case
बाबा सिद्दिकींच्या हत्येचे कारण आले समोर

ष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे कारण समोर आले आहे. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे हत्येचे कारण समोर आले आहे.

बाबा सिद्दिकींच्या हत्येचे कारण आले समोर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे कारण समोर आले आहे. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे हत्येचे कारण समोर आले आहे. 

गरीब आणि निष्पाप लोकांच्या घरांचे संरक्षण करताना माझ्या वडिलांचा जीव गेलाय. आमचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये. माझ्या वडिलांचे बलिदान नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे; असे ट्वीट झिशानने केले आहे. यामुळे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे कारण समोर आले आहे. 

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी बाबा सिद्दिकी यांची हत्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर झिशानने केलेल्या ट्वीटमुळे नेमक्या कोणत्या प्रकल्पातील वादातून हत्या झाली आणि त्या प्रकल्पातील गुंतवणूकदार कोण यावरुन चर्चेला उधाण आले आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo