Excessive Sweat in Babies : तुम्हाला माहिती आहे का की, मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांना सहसा घाम (Sweat) येत नाही? आपण जेव्हा जास्त वेळ उन्हात किंवा शारीरिक काम करतो, तेव्हा आपल्याला घाम येतो. पण लहान मुलांना तुम्ही उन्हात घेऊन गेलात किंवा इतर ठिकाणी, तरी त्यांना आपल्याप्रमाणे घाम येत नाही आणि त्यांची त्वचा बऱ्याच वेळा कोरडी (Dry) आणि ताजीतवानी राहते. याचे कारण असे आहे की, लहान मुलांचे बॉडी मेकॅनिझम मोठ्या व्यक्तींपेक्षा खूप वेगळे काम करते.
लहान मुलांना कमी घाम का येतो?
लहान मुलांमध्ये स्वेद ग्रंथी (Sweat Glands) पूर्णपणे विकसित झालेल्या नसतात. म्हणजेच, त्या अपरिपक्व (Immature) असतात. त्यांच्या पूर्ण विकासापर्यंत या ग्रंथी कार्य करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या शरीरातून खूप कमी घाम बाहेर पडतो. अशा परिस्थितीत, लहान मुले शरीराचे तापमान (Body Temperature) नियंत्रित ठेवण्यासाठी वारंवार शारीरिक स्थिती (Body Position) बदलण्यावर अवलंबून असतात. यामुळे मुलांचे शरीर किंचित गरम होऊ शकते आणि त्वचेवर लालसरपणा (Redness) दिसू शकतो.
सतत घाम येणे धोक्याची घंटा
सामान्यपणे मुलांना घाम येत नसला तरी, जर तुमच्या बाळाला वारंवार आणि प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल, तर ते धोक्याचे लक्षण असू शकते. तज्ज्ञांच्या मते, जर बाळाला दूध पिताना किंवा झोपेत असताना वारंवार घाम येत असेल, तर ही सामान्य गोष्ट नाही. हे एखाद्या दीर्घकालीन (Chronic) आजाराचे किंवा गंभीर आरोग्याच्या समस्येचे संकेत असू शकते.
हेही वाचा - Health Tips: प्रथिने आणि लोहाने समृद्ध असलेली तूर डाळ 'या' लोकांनी खाऊ नये
कोणत्या मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात?
मुलांना प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल, तर त्यांच्यात खालीलपैकी काही समस्या असण्याचा धोका असतो:
- हृदयाशी संबंधित समस्या (Heart Problem): हृदयाचे काही विकार.
- संसर्ग (Infections): शरीरातील गंभीर संसर्ग.
- चयापचय किंवा एंडोक्राइन विकार (Metabolic or Endocrine Disorder).
- थायरॉईड हार्मोनची वाढ: शरीरात अति थायरॉईड हार्मोन तयार होणे.
अशा परिस्थितीत, मुलाला सिस्टिक फायब्रोसिस (Cystic Fibrosis) नावाचा श्वसनविकार (Respiratory Disorder) देखील होऊ शकतो. या स्थितीत मुलांच्या शरीरात मीठ (Salts) स्रवण्याची पद्धत बदलते आणि शरीर सामान्यपणे प्रतिक्रिया देण्याऐवजी खूप वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागते. जर तुमच्या मुलाला जास्त घाम येत असेल, तर दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा - Health Tips: दह्यात साखर मिसळून खावे की मीठ, जाणून घ्या दही खाण्याची योग्य पद्धत
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)