Tuesday, January 14, 2025 04:28:20 AM

BACHU KADU ON JAYANT PATIL
'तुमची कुवत काय ?'

बच्चू कडू यांनी जयंत पाटलांना सुनावले आहे. 'त्यांच्यात दम राहिलेला नाही, त्यांना असं वाटत असेल की आम्ही वर आल्याने त्यांचं नुकसान होत असेल तर तुमची कुवत काय ते माहित पडते.

तुमची कुवत काय

२८ सप्टेंबर, २०२४, अमरावती : बच्चू कडू यांनी जयंत पाटलांना सुनावले आहे. 'त्यांच्यात दम राहिलेला नाही, त्यांना असं वाटत असेल की आम्ही वर आल्याने त्यांचं नुकसान होत असेल तर तुमची कुवत काय ते माहित पडते. त्यांची कुवतच नाही. एवढ्या ताकदीने तुम्हाला मतदान भेटल्यावरही तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आणू शकले नाही. मुस्लिम आणि बौद्ध समाजाने तुम्हाला जर मत दिले नसते तर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झालं असतं अशी अवस्था होती', 'तिसरा म्हणून बच्चू कडू लढला मी ही निवडून आलो. अरविंद केजरीवाल लढले ते निवडून आले, आणि राष्ट्रवादी सुद्धा तिसरीच होती, जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा लोकही असंच म्हणत होते की राष्ट्रवादी ही काँग्रेसच नुकसान करण्यासाठी आहे.', अशा शब्दात बच्चू कडू यांनी जयंत पाटील यांना सुनावलं आहे. 


सम्बन्धित सामग्री