Saturday, June 06, 2026 09:54:04 AM

Crime News: मध्यरात्री घरात घुसला जावई; बायको आणि सासूला निर्घृणपणे संपवलं, नंतर मेव्हणीला...

लग्नाला 5 वर्षे झाल्यानंतर घरगुती वादातून माथेफिरू पतीने पत्नीसह सासूला संपवले. छताच्या मार्गाने घरात घुसून त्याने झोपेत असलेल्या पत्नीवर आणि सासूवर चाकूने वार केले.

crime news मध्यरात्री घरात घुसला जावई बायको आणि सासूला निर्घृणपणे संपवलं  नंतर मेव्हणीला

Husband Kills Wife and Mother-in-law : एका माथेफिरू व्यक्तीने आपल्याच सासुरवाडीच्या कुटुंबावर रक्तरंजित हल्ला केला. त्याने मध्यरात्री पत्नीच्या माहेरी पोहोचून छताच्या मार्गाने घरात प्रवेश केला. त्याने झोपेत असलेल्या पत्नीवर आणि सासूवर चाकूने वार केले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा हल्ला सुरू असताना आरडाओरडा ऐकून पत्नीचे वडील जावयाला अडवण्यासाठी आले. मात्र, त्यांच्यावरही या माथेफिरूने तशाच पद्धतीने चाकूने वार करत खुनी हल्ला केला.

सासरे आणि मेहुणीवरही हल्ला
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. नगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनपुर गावात या माथेफिरूची सासुरवाडी आहे. अमित कुमार गुप्ता असे या हल्लेखोराचे नाव आहे. तो शनिवारी 25 एप्रिल रोजी मध्यरात्री साधारण 12:30 वाजता आपल्या सासरी पोहोचला. छताच्या मार्गाने घरात घुसून त्याने झोपेत असलेल्या पत्नीवर आणि सासूवर चाकूने वार केले. या हल्ल्यात पत्नी प्रीती गुप्ता (23) आणि सासू सुशीला देवी (55) यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी पत्नीचे वडील अंतू गुप्ता (60) त्यांना वाचवण्यासाठी धावून आले. क्रूर बनलेल्या अमितने त्यांच्यावरही चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर, मध्ये पडलेल्या आपल्या मेहुणी कीर्ती हिचाही गळा दाबून त्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या अंतू गुप्ता यांना जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

वादाचे नेमके कारण काय?
अमित आणि प्रीती यांचे लग्न 5 वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना 3 वर्षांचा एक मुलगा आहे. पोलीस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कशावरून तरी वाद सुरू होता. प्रीती एका महिन्यापूर्वीच आपल्या माहेरी आली होती. काही दिवसांपूर्वी अमित सासरी येऊन गेला होता, मात्र त्यानंतर त्याने मध्यरात्री छुप्या मार्गाने येऊन हा भीषण गुन्हा केला. घरगुती कलहातून अमितने एवढे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - Crime News: संसाराची घडी बसण्यापूर्वीच विस्कटली! पती-पत्नीच्या वादातून 22 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

पोलीस तपासाला वेग
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्वाट (SWAT), सर्व्हिलन्स आणि फील्ड युनिटचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कीर्तीच्या तक्रारीच्या आधारे अमित कुमार गुप्ता विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यासाठी आणि आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे. रसडा क्षेत्राचे पोलीस क्षेत्राधिकारी (CO) आलोक गुप्ता स्वतः या तपासावर देखरेख करत आहेत.

फरार आरोपीसाठी तीन पथके तैनात
घटनेनंतर अमित गुप्ता फरार झाला असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी 3 विशेष पथके तयार केली आहेत. आरोपीच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर पोलीस सतत छापे टाकत आहेत. बरेली आणि बलिया पोलिसांनी या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केले असून गुन्हेगाराला लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे आश्वासन दिले आहे. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण गावात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा - Crime News : '4 गर्लफ्रेंड, दारूचं व्यसन..' होणाऱ्या पतीचं खरं रूप साखरपुड्यानंतर समजलं; तरुणीनं 12 पानांची नोट लिहिली अन्....


सम्बन्धित सामग्री