पुणे : बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी घालण्याबाबत पुणे पोलिसांनी परिपत्रक काढले. लेझर बीम लाईट आकाशात सोडल्यास हवाई वाहतुकीला अडथळे निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पुढील ६० दिवसांसाठी ही बंदी घातली आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या परिपत्रकामुळे दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात बीम लाईट आणि लेझर बीम लाईट यांचा वापर करता येणार नाही.