मुंबई : कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी राज्यातील बँक कर्मचारी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी लाक्षणिक संपावर जात आहेत. नाशिकमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला होता. याआधी बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला होता. या घटनांचा निषेध म्हमून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अर्थात यूएफबीयूने १६ नोव्हेंबर २०२४ रोजी लाक्षणिक संपाची घोषणा केली आहे. बँक कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण द्यावे, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला आहे.
गुरु नानक जयंती असल्यामुळे शुक्रवार १५ नोव्हेंबरला तर लाक्षणिक संपामुळे शनिवार १६ नोव्हेंबरला बँका बंद असतील. या व्यतिरक्त रविवार १७ नोव्हेंबरला बँकांना सुटी आहे. यामुळे सलग तीन दिवस बँकांचे कार्यालयीन कामकाज बंद असेल. या काळात ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करता येतील. कार्ड पेमेंट, यूपीआय या सेवा सुरू असतील. एटीएममधून रोख रक्कम काढणेही शक्य होईल. पण कार्यालयात जाऊन एखादे काम करुन घ्यायचे असल्यास सोमवार १८ नोव्हेंबरची वाट बघावी लागेल.
नोव्हेंबर २०२४ मधील सुट्यांचे दिवस
शुक्रवार १ नोव्हेंबर - लक्ष्मीपूजन, सुटी
शनिवार २ नोव्हेंबर - बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, सुटी
रविवार ३ नोव्हेंबर - भाऊबीज, सुटी
शनिवार ९ नोव्हेंबर - दुसरा शनिवार, बँकांना सुटी
रविवार १० नोव्हेंबर - सुटी
शुक्रवार १५ नोव्हेंबर - गुरु नानक जयंती, सुटी
शनिवार १६ नोव्हेंबर - बँकांचा लाक्षणिक संप
रविवार १७ नोव्हेंबर - सुटी
शनिवार २३ नोव्हेंबर - चौथा शनिवार, बँकांना सुटी
रविवार २४ नोव्हेंबर - सुटी