Wednesday, May 14, 2025 10:27:55 PM

'या' बँकांच्या स्पेशल एफडी स्किम्स अजूनही सुरू! रिटर्नही मिळतोय दणक्यात; जाणून घ्या दर

FD Rates: अनेक बँकांनी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह त्यांच्या विशेष एफडी बंद केल्या आहेत. पण, अजूनही अनेक बँका आहेत, ज्या विशेष एफडी चालवत आहेत किंवा त्यांनी विशेष एफडी सुरू केल्या आहेत.

या बँकांच्या स्पेशल एफडी स्किम्स अजूनही सुरू रिटर्नही मिळतोय दणक्यात जाणून घ्या दर

FD Rates: सर्वसामान्य नागरिकांना बचत आणि त्यावर अधिक परतावा म्हटलं की, प्रथम एफडीचाच पर्याय आठवतो. इतर गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर येत असतानाही आजही एफडी गुंतवणुकदारांच्या संख्येत वाढ होत आहे. कारण, सर्वांत सुरक्षित गुंतवणूक म्हणून एफडीकडे पाहिले जाते.

दरम्यान, अनेक बँकांनी नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच त्यांच्या विशेष एफडी बंद केल्या आहेत. पण, अजूनही अनेक बँका आहेत ज्या विशेष एफडी चालवत आहेत किंवा त्यांनी विशेष एफडी सुरू केल्या आहेत. अशा 5 बँकांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्या विशेष एफडीमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला 8.05 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते.

हेही वाचा - लवकरच कमी होऊ शकतात पेट्रोल-डिझेलचे दर; क्रूडच्या किमतीत 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण

Indian Bank FD Scheme : इंडियन बँकेने IND Supreme 300-day आणि IND Super 400-day च्या विशेष एफडीसाठी अंतिम तारीख वाढवली आहे. आता ही एफडी 30 जून 2025 रोजी संपेल. ही एफडी योजना अति ज्येष्ठ नागरिकांना 8.05 टक्के व्याज देते.

SBI Amrit Vrishti 444 days Special FD scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया ही बहुतेक मध्यमवर्गीयांच्या पहिल्या पसंतीची बँक आहे. SBI ने अमृत सृष्टी योजना पुन्हा सुरू केली आहे. ही योजना 31 मार्च 2025 रोजी संपली. अमृत वृष्टी योजनेअंतर्गत, लोकांना 444 दिवसांच्या कालावधीसाठी एफडी करावी लागते. ही नवीन योजना 15 एप्रिल 2025 पासून लागू होईल. पण या वेळी, योजना सुरू करताना बँकेने व्याजदर 0.20 पैशांनी कमी केला आहे. आता 444 दिवसांच्या या विशेष एफडी योजनेत लोकांना 7.05 टक्के दराने व्याज मिळेल. पूर्वी ते 7.25 टक्के होते.

Canera Bank : कॅनरा बँक 444 दिवसांच्या विशेष एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना7.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

IDBI Bank Utsav FD scheme : आयडीबीआय बँकेने उत्सव एफडी योजनेअंतर्गत 300 दिवस आणि 375 दिवसांच्या एफडी बंद केल्या आहेत. तरीही तुम्ही काही खास एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. ग्राहकांना आता 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याज 7.75 टक्के आहे. तर अति ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्के दराने व्याज मिळेल.
555 आणि 700 दिवसांची एफडी : त्याचप्रमाणे, ग्राहकांना आयडीबीआय बँकेच्या 555 दिवसांच्या एफडीवर 7.30 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.95 टक्के व्याज मिळू शकते. याशिवाय, आता 700 दिवसांच्या एफडीवर 7 टक्के व्याज दिले जात आहे. या कालावधीसाठी गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज मिळू शकते आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याज मिळू शकते. या सर्व एफडीची अंतिम तारीख सध्या 30 जून 2025 आहे.

हेही वाचा - ट्रम्प टॅरिफ आणि ट्रेड वॉरचा भारताला जबरदस्त फायदा; स्मार्टफोन, टीव्ही इलेक्ट्रॉनिक्स स्वस्त होणार?

Punjab & Sind Bank Special FD : पंजाब आणि सिंध बँकेने देखील त्यांच्या विशेष एफडीची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. बँकेने 333 दिवसांच्या आणि 555 दिवसांच्या एफडी योजना बंद केल्या आहेत, ज्या अनुक्रमे 7.2 टक्के आणि 7.45 टक्के व्याज देत होत्या. तसंच, आता गुंतवणूकदार 444 दिवस, 777 दिवस आणि 999 दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. 444 दिवसांच्या एफडीवर 7.10 टक्के व्याज दिले जात आहे, तर 777 दिवसांच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज दिले जात आहे. याशिवाय 999 दिवसांच्या एफडीवर 6.35 टक्के व्याज दिले जात आहे. सध्याचे दर 1 एप्रिल 2025 पासून लागू आहेत.


सम्बन्धित सामग्री