Women T20 Series: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पुढील मालिकेबाबत बीसीसीआयने अचानक मोठा निर्णय घेतला आहे. 2025 महिला विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया डिसेंबरमध्ये पुन्हा मैदानात उतरणार होती. मात्र, आता हा प्लॅन बदलला असून भारतीय चाहत्यांना विश्वविजेत्या संघाचे पुनरागमन अजून काही काळ पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - ICC Action on Babar Azam: बाबर आझमला मोठा धक्का! टी20 तिरंगी मालिकेपूर्वी ICC ने सुनावली कठोर शिक्षा
भारत-बांगलादेश महिला मालिका पुढे ढकलली
डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणाऱ्या बांगलादेश महिला संघाची तीन ODI आणि तीन T20 सामन्यांची मालिका बीसीसीआयने स्थगित केली आहे. ESPNcricinfo नुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) बीसीसीआयने पत्र पाठवून हा दौरा नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. हीच मालिका 2026 महिला प्रीमियर लीगपूर्वी भारतीय महिलांची शेवटची T20 तयारी असणार होती. तसेच भारत-बांगलादेश महिला ODI अजिंक्यपद स्पर्धेची ही सुरुवात ठरणार होती.
हेही वाचा - Team India Controversy: गिल आणि गंभीर यांच्यातील वाद विकोपाला? दुखापतीनंतर टीममध्ये अंतर्गत कलह; दुसरी कसोटी संकटात
राजकीय परिस्थिती, तांत्रिक कारणे किंवा वेळापत्रकातील बदल यापैकी कोणत्या कारणामुळे मालिका पुढे ढकलली गेलेली आहे, हे बीसीसीआयने अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. फक्त महिला संघच नव्हे, तर भारतीय पुरुष संघाचा बांगलादेश दौरा देखील पुढे ढकण्यात आला होता. ऑगस्ट 2025 मध्ये होणाऱ्या 3 ODI आणि 3 T20 मालिकेला बीसीसीआय आणि बीसीबीने परस्पर संमतीने सप्टेंबर 2026 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.