Saturday, February 08, 2025 05:39:12 PM

Palghar
ट्रेकिंगची आवड असेल तर सावधान; पालघरमध्ये घडली धक्कादायक घटना

पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

ट्रेकिंगची आवड असेल तर सावधान पालघरमध्ये घडली धक्कादायक घटना

पालघर : ट्रेकिंग करण्याची इच्छा असणाऱ्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल मात्र सवय नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डहाणूच्या प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा दर्शन घेऊन उतरताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे . मिलन डोंबरे असं या पंचवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे. मिलन आपल्या पत्नी भाऊ आणि इतर कुटुंबीयांसह महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेला होता.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या मिलन नावाचा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दर्शनासाठी जाताना मिलन गडावर हजार पायऱ्या सहजच चढला. मात्र उतरताना त्याला अचानक उलटी झाली आणि काही क्षणातच त्याचा तिथेच मृत्यू झाला.

 

हेही वाचा : पुण्यात वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावे प्रॉपर्टी; नेमकं प्रकरण काय?

 

मिलनला देवीचा गड उतरताना उलटी झाली. मिलनच्या कुटुंबीयांनी मिलनला खांद्यावर घेऊन कासा उपजिल्हा रुग्णालय गाठलं. मात्र तोपर्यंत मिलनचा मृत्यू झाला होता. पोटात अन्न नसताना अति उंचावर चालल्याने मिलनचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान सवय नसेल तर अचानक ट्रेकिंगसाठी ट्रेकर्सने जाऊ नये असा आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. अशाच ट्रेकिंगच्या आवडीतून मिलनला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे ट्रेकिंग करताना आधी शरीराची थोडीफार कसरत करून नंतरच ट्रेकिंग करा असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.

 


सम्बन्धित सामग्री