Wednesday, December 11, 2024 11:51:38 AM

belapur-slum-incident
9 महिन्याच्या चिमुकल्यावर कुऱ्हाडीने हल्ला

बेलापूरमधील झोपडपट्टीत भयंकर घटना

9 महिन्याच्या चिमुकल्यावर कुऱ्हाडीने हल्ला

मुंबई : नवी मुंबईच्या बेलापूर येथील पंचशील नगर झोपडपट्टीत एका शुल्लक वादातून भयंकर घटना घडली. शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका 9 महिन्याच्या चिमुकल्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यापर्यंत झाले आहे. आरोपीने चिमुकल्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरू केला असून घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.

9 महिन्याचा चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री



jaimaharashtranews-logo