Friday, December 05, 2025 02:22:50 AM

OMG! बंगळुरूचा मोमोवाला महिन्याला कमावतो 31 लाख रुपये? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

व्हिडिओमध्ये विक्रेता रोज जवळपास 950 प्लेट मोमोज विकतो, असं सांगितलं आहे. मोमोजच्या एका प्लेटची किंमत 110 रुपये आहे.

omg बंगळुरूचा मोमोवाला महिन्याला कमावतो 31 लाख रुपये व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय

Bengaluru Momos Seller Video: बंगळुरूमध्ये रस्त्याच्या कडेला मोमोज विकणारा एक विक्रेता महिन्याला तब्बल 31 लाख कमावतो, असा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या धक्कादायक दाव्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र या व्हिडिओमागचं खरं चित्र काय? जाणून घेऊया…

व्हिडिओ कसा व्हायरल झाला?

इंस्टाग्रामवर @cassiusclydepereira या क्रिएटरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘केके मोमोज’ नावाच्या स्टॉलवर एक दिवस घालवल्याचे सांगितले. व्हिडिओमध्ये विक्रेता रोज जवळपास 950 प्लेट मोमोज विकतो, असं सांगितलं आहे. मोमोजच्या एका प्लेटची किंमत 110 रुपये आहे. 

व्हिडिओतील दावा  

एका तासात 118 प्लेट्स विक्री
दिवसभरात सुमारे 950 प्लेट्स
रोजची एकूण कमाई: 1,00,000 च्या आसपास
महिन्याची कमाई: 30-31 लाख (दिवसाची कमाई × 30)

पोस्टनुसार, स्टॉल लहान असला तरी ग्राहकांची रांग न थांबता लागते. लोक मोमोज, सूप आणि फ्राय आयटम्ससाठी अक्षरशः गर्दी करतात.

हेही वाचा - Muzaffarnagar Scooter Fine: बापरे! स्कूटर चालकाला ठोठावण्यात आला 20.74 लाख रुपयांचा दंड; चालान पाहून सोशल मीडियावर उडाली खळबळ

बी.कॉम पदवीधर VS मोमो विक्रेता

कंटेंट क्रिएटरने व्हिडिओमध्ये थेट तुलना केली आहे की, त्याच्या दुकानात दररोज सुमारे 950 प्लेट्स विकल्या जातात. प्रति प्लेट अंदाजे 110 रुपये या किमतीत, एकूण उत्पन्न दररोज अंदाजे 1 लाख रुपये आहे. कंटेंट क्रिएटरने पुढे स्पष्ट केले की एक मोमो विक्रेता कठोर परिश्रम आणि सातत्य याद्वारे लाखो रुपये कमावतो. त्याने बी.कॉम. पदवीधर आणि मोमो विक्रेत्याच्या उत्पन्नाची तुलना देखील केली. त्याच्या मते बी.कॉम पदवीधरांचा साधारण मासिक पगार 25 ते 35 रुपये असतो. यामुळे सोशल मीडियावर "डिग्रीपेक्षा स्किल्स आणि बिझनेस महत्त्वाचा" अशा चर्चा रंगल्या आहेत. म्हणजेच दावा जरी आकर्षक असला तरी पूर्ण सत्य अजूनही पडताळणीच्या प्रतीक्षेत आहे. 

हेही वाचा - Bengaluru Jail Video: जेलमध्ये नाच, दारू आणि पार्टी! बंगळुरू तुरुंगातील कैद्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

हे आकडे वास्तववादी आहेत का? 

या कमाईचे आकडे ऐकून अनेकांना धक्का बसला असला, तरी काही जणांनी यावर शंका व्यक्त केली आहे. इतका टर्नओव्हर असेल, तर जास्त कर्मचारी, किचन सेटअप, सप्लाय चेन दिसायला हवी, असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तथापी, 950 प्लेट्स रोज विकल्या जातात का? याबाबतही अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.  


सम्बन्धित सामग्री