Monday, May 11, 2026 11:41:24 AM

Crime News : भयंकर! तिनं बॉयफ्रेंडचे हात-पाय बेडला बांधले, डोळ्यावर पट्टीही बांधली...आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं; खेळ खल्लास...

प्रेमा नावाच्या 27 वर्षांच्या तरुणीचे किरणसोबत प्रेमसंबंध होते, परंतु किरणने लग्नास नकार दिल्याने ती प्रचंड संतापली होती. यामुळे तिने सूड घेण्याचे ठरवले.

crime news  भयंकर तिनं बॉयफ्रेंडचे हात-पाय बेडला बांधले डोळ्यावर पट्टीही बांधलीआणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं खेळ खल्लास

Lover Burnt Alive in BDSM Style Murder : लग्नाला नकार दिल्यामुळे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमा नावाच्या 27 वर्षांच्या तरुणीचे किरणसोबत प्रेमसंबंध होते, परंतु किरणने लग्नास नकार दिल्याने ती प्रचंड संतापली होती. या अपमानाचा सूड घेण्यासाठी तिने किरणला कायमचे संपवण्याचा एक भयानक कट रचला. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून तिच्या कृत्याने संपूर्ण शहर हादरले आहे.

BDSM स्टाईल सेक्स गेमच्या बहाण्याने घातला मृत्यूचा विळखा
प्रेमा नावाच्या तरुणीने किरणला तिच्या रूमवर 'क्वालिटी टाइम' घालवण्याच्या बहाण्याने बोलावले होते. तेथे तिने त्याला तिच्यासोबत एका सेक्स गेमचा भाग होण्यास सांगितले, ज्याला BDSM स्टाइल म्हटले जाते. किरण तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तयार झाला. योजनेनुसार, प्रेमा आणि किरणचे हात आणि पाय बेडच्या चार कोपऱ्यांना मजबुतीने बांधले आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. किरणला वाटले की, हा केवळ खेळाचा भाग आहे, पण तो आपल्या मृत्यूच्या जाळ्यात अडकला होता.

तडफडून मृत्यू आणि लाइव्ह व्हिडिओ
प्रियकर असहाय्य स्थितीत बेडला बांधलेला असतानाच प्रेमाचे क्रूर रूप समोर आले. तिने अचानक त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि काडी ओढून त्याला आग लावून दिली. किरण आगीच्या ज्वालांमध्ये जळत असताना जीवाच्या आकांताने ओरडत होता, पण प्रेमाचे मन मुळीच पाघळले नाही. उलट, ती निर्दयीपणे आपल्या मोबाईलवरून या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करत राहिली. किरणचा तडफडून मृत्यू होईपर्यंत ती तिथेच उभी राहून व्हिडिओ बनवत होती.

हेही वाचा - Goregaon Drug Case : गोरेगाव नेस्को ड्रग्सप्रकरण! ड्रग्ज रॅकेटमध्ये मोठी खळबळ; 'ड्रग्ज क्वीन'ला अटक

मोबाईलमधील पुराव्यामुळे गुपित उघड
परिसरात जळालेला मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आणि संशयावरून प्रेमाला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र, जेव्हा पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना धक्काच बसला. मोबाईलमध्ये किरणला बांधण्यापासून ते त्याला जिवंत जाळण्यापर्यंतचा संपूर्ण 27 वर्षांच्या तरुणाचा मृत्यूचा व्हिडिओ पोलिसांना सापडला. हा पुरावा प्रेमाच्या विरोधात सर्वात मोठा पुरावा ठरला आहे. पोलिसांनाही हादरवून टाकणारी ही घटना कर्नाटकची राजधानी बेंगलुरुमध्ये घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या तरुणीला तातडीने अटक केली. 

समाजात खळबळ आणि पुढील कारवाई
या घटनेने नात्यांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी आरोपी प्रेमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. प्रेमासारख्या सुशिक्षित तरुणीने इतक्या थंड डोक्याने केलेला हा खून पाहून पोलीस अधिकारीही अवाक झाले आहेत. या 'डेथ गेम'च्या व्हिडिओमुळे कोर्टात आरोपीला कठोर शिक्षा होणे आता निश्चित मानले जात आहे. बेंगलुरु पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Nagar Crime: 'आई, मला वाचवा...'; आधी पिस्तूल, मग केमिकल स्प्रे मारला आणि शेवटी सपासप वार; वाळूजमध्ये सासूच्या डोळ्यांदेखत सुनेला निर्घृणपणे संपवलं


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या