Tuesday, November 18, 2025 09:09:23 PM

Bhaubeej Shubhechcha in Marathi : बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण, द्या खास शुभेच्छा!

भावा-बहिणीमधील नातं अजून गोड करणारा दिवाळसणातील दिवस म्हणजे भाऊबीज..

bhaubeej shubhechcha in marathi  बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण द्या खास शुभेच्छा

Happy Bhaubeej 2025 Wishes Shubhechcha in Marathi : हिंदू धर्मातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला, म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी, हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. भाऊबीज हा बहीण-भावाच्या पवित्र आणि अतुट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावून, औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाची भेटवस्तू देऊन तिच्याप्रती आदर व्यक्त करतो.

दिवाळीच्या या मंगलमय वातावरणात भाऊबीज हा सण नातं जपण्याचा आणि आनंद वाटण्याचा खास प्रसंग असतो. बहीण-भाऊ एकमेकांना भेटवस्तू देऊन आणि मनपासून शुभेच्छा देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. यावर्षीच्या भाऊबीजेला तुम्ही तुमच्या बहीण किंवा भावाला काही हटके आणि खास शुभेच्छा संदेश पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवू शकता. हे शुभेच्छा संदेश केवळ औपचारिकता नसून, तुमच्या मनातील खरे प्रेम आणि भावना व्यक्त करण्याचे सुंदर माध्यम ठरतील.

या भाऊबीजेच्या मराठी शुभेच्छा तुम्ही तुमच्या बहीण किंवा भावाला पाठवू शकता:

1. सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!

2. तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्यानं मला आनंदाचं भरतं येतं.
तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!

3. काही नाती खूप अनमोल असतात. त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी. भाऊबीजेच्या शुभेच्छा!  

हेही वाचा - Bhaubij 2025: भाऊबीजेला 'या' वेळेत करू नका औक्षण! काय करावं आणि काय टाळावं, जाणून घ्या

4. नाते भाऊ बहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

5. जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीजेनिमित्त गोड शुभेच्छा!

6. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडी ही माया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

7. दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू हे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण-भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

8. क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख -लाख शुभेच्छा तुला, आज आहे बहीण भावाचा पवित्र सण भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

9. तुझा राग, तुझं प्रेम, तुझं रक्षण… सगळंच गोड आहे
या भाऊबीजेच्या दिवशी तुला सांगते… तुझ्यासारखा भाऊ मिळणं म्हणजे भाग्य आहे.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा - Bhaubeej 2025 : काय आहे भाऊबीजेचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व? जाणून घेऊ, यामागची पौराणिक कथा

10. जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊ दे बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!

11. बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई, दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

12. चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा, भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 

13. भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी
एक तरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिकता आणि परंपरांवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही.)


सम्बन्धित सामग्री