महाराष्ट्र: लाडकी बहीण योजना ही आतापर्यंतची सर्वात आवडती योजना ठरली. यातच आता मंत्री भरत गोगावले यांनी या योजनेसंदर्भात एक वक्तव्य केलंय. हे वक्तव्य करून मंत्री भरत गोगावले यांनी सरकारला थेट घरचा आहेर दिलाय. दरम्यान 'घाईगडबडीत 'अपात्र बहिणीं'ना पात्र केलं' अशी कबुली मंत्री भरत गोगावले यांनी दिल्याने सर्वत्र चर्चा सुरूय.
दरम्यान महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात मात्र आता महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा असतांनाच काही लाडक्या बहिणींना सरकारला हप्ते परत करावे लागणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींची चिंता वाढतांना पाहायला मिळतेय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कोणत्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार?
1.ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण आता निकषा बाहेर बसणाऱ्या महिलांचा अर्ज हा बाद केला जाईल.
2.अर्ज बाद केल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.
3.ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही.
4.ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील. तसंच मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत असतील. तसंच सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
5.लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहे.तसंच ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.