मुंबई: तुमच्या बँक खात्यात एक रुपयाही नसला तरीही तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता. हो, हे खोटे वाटेल पण खरे आहे. आता BHIM UPI अॅपच्या नवीन फीचर, UPI सर्कलमुळे हे शक्य झाले आहे. या फीचरमुळे तुम्ही बॅलन्सशिवाय, कोणत्याही व्याज किंवा शुल्काशिवाय पैसे पाठवू शकता.
यूपीआय (UPI) सर्कल म्हणजे काय?
यूपीआय सर्कल हे एक विश्वास ठेवता येणारे डिजिटल वैशिष्ट्य आहे. त्याद्वारे, तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे देण्यास कुटुंबातील सदस्यांना किंवा विश्वासू मित्रांना अधिकृत (परवानगी) करू शकता. याचा अर्थ तुम्ही तुमच्या मंजुरीच्या अधीन राहून किंवा एका निश्चित मर्यादेत तुमच्या खात्यातून पैसे हस्तांतरित करण्यास एखाद्याला अधिकृत करू शकता. हे एका उदाहरणाने समजून घेऊया - जर तुम्ही जवळच्या मित्रासाठी 2,000 रुपयाची मर्यादा सेट केली तर ती व्यक्ती तुमच्या खात्यातून त्या रकमेपर्यंत UPI पेमेंट करू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इच्छित असल्यास प्रत्येक व्यवहारासाठी मॅन्युअल परवानग्या देखील सेट करू शकता.
हेही वाचा: Zoho: झोहोचा पेमेंट हार्डवेअरसह साउंडबॉक्स लाँच, GPay, Paytm आणि PhonePe ला टक्कर देण्यासाठी सज्ज
यूपीआय सर्कल फीचर कसे सक्रिय करायचे?
यूपीआय सर्कल फीचर सक्रिय करणे खूप सोपे आहे. ते कसे करायचे ते समजून घेऊयात...
सर्वप्रथम BHIM UPI अॅप उघडा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग इन करा.
आता तुम्हाला अॅपमध्ये “UPI Circle” चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तुमच्या कुटुंबाचा किंवा विश्वासू मित्रांचा मोबाईल नंबर, UPI आयडी किंवा QR कोड स्कॅन करून ते जोडा. आता ते किती रकमेचे व्यवहार करू शकतात ते ठरवा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही प्रत्येक व्यवहारासाठी तुमच्या मंजुरीची अट देखील घालू शकता. शेवटी, तुमचा UPI पिन एंटर करा आणि पुष्टी (Comfirm) करा. यानंतर जरी तुमच्या खात्यात शून्य रक्कम शिल्लक असली तरीही तुम्ही जोडलेली व्यक्ती आता तुमच्या वतीने पेमेंट करू शकतो.
वैशिष्ट्य खास का आहे?
हे वैशिष्ट्य ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि घरातील सदस्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, ज्यांना निधीअभावी डिजिटल पेमेंट करणे कठीण जाते. तात्काळ पेमेंट आणि तुमच्या खात्यात निधीची कमतरता यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत देखील हे उपयुक्त आहे.