Wednesday, December 11, 2024 11:13:46 AM

Delhi
दिल्लीत सीआरपीएफ शाळेजवळ मोठा स्फोट

दिल्लीमधील रोहिणी परिसरातील प्रशांत विहार परिसरात रविवारी सकाळी मोठा स्फोट झाला.

दिल्लीत सीआरपीएफ शाळेजवळ मोठा स्फोट

दिल्ली : दिल्लीमधील रोहिणी परिसरातील प्रशांत विहार परिसरात रविवारी सकाळी मोठा स्फोट झाला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शाळेच्या भिंतीजवळ हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. हे चित्र पाहून रोहिणी परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. तज्ज्ञांचं पथक तपास करत आहे, आम्ही या स्फोटाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती रोहिणीचे पोलीस पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी दिली.  


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo