DRI Busts Chinese Firecracker: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) चालवलेल्या ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ मोहिमेत चिनी फटाके जप्त करण्यात आले आहेत. न्हावा शेवा बंदरावरून हाताळली गेलेल्या कारवाईत तब्बल 4.82 कोटी किमतीच्या फटाक्यांची मालवाहतूक जप्त करण्यात आली. तसेच यासंदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे, असे डीआरआय अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, डीआरआयच्या पथकाने न्हावा शेवा बंदरात चीनहून येणारा 40 फूट लांबीचा कंटेनर रोखला. या कंटेनरमध्ये कपडे असल्याचे दाखवले जात होते. सविस्तर तपासणी दरम्यान कपड्यांच्या वरच्या थरांमध्ये आणि आतल्या भागात एकूण 46,640 फटाके लपवून ठेवलेले आढळले.
हेही वाचा - Pune Hinjewadi Attack: हिंजवडी हादरली! तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला; सहा आरोपी अटकेत
डीआरआयने पुढील तपासात तस्करी साखळीशी संबंधित गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच गुजरातमधून या व्यवहाराशी संबंध असलेल्या एका प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान आढळलेल्या पुराव्यांमुळे तस्करीच्या नेटवर्कची कार्यपद्धत समोर आली आहे. विदेशी व्यापार धोरणानुसार फटाक्यांची आयात 'प्रतिबंधित' म्हणून मोडते. तसेच यासाठी विस्फोटक नियम, 2008 अन्वये वैध परवाने घेणे अनिवार्य आहे.
हेही वाचा - Ranjit Kasle Arrested: लातूरमध्ये माजी पोलीस अधिकारी रणजीत कासलेला गुजरात पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'मै झुकुंगा नही...' अटकेनंतर कासलेची पोलिसांसमोर पुष्पा स्टाईल
दरम्यान, डीआरआयने सांगितले की अशा बेकायदेशीर आयातीमुळे सार्वजनिक आणि बंदर-आधारभूत सुरक्षेला धोका उद्भवतो. तथापी, मागच्या आठवड्यात डीआरआयने न्हावा शेवावर 20 मेट्रिक टन फटाक्यांचा साठाही जप्त केला होता, ज्याची किंमत सुमारे 6.32 कोटी होती.