Saturday, January 18, 2025 05:27:33 AM

IPL 2024 biggest Records
आयपीएल 2024 स्पर्धेत बनवलेले काही मोठे रेकॉर्ड्स

आयपीएल २०२४ (IPL 2024) स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले होते. या स्पर्धेतील फायनलचा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) य

आयपीएल 2024 स्पर्धेत बनवलेले काही मोठे रेकॉर्ड्स

मुंबई - आयपीएल २०२४ (IPL 2024) स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले होते. या स्पर्धेतील फायनलचा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली खेळताना, कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. दरम्यान या आयपीएलमध्ये मोठे रेकॉर्ड्स देखील पाहायला मिळाले होते. 

सर्वात मोठा स्कोअर (Biggest score)

आयपीएल २०२४ स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात २८७ धावांचा डोंगर उभारला गेला होता. हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर ठरला होता. याच हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) झालेल्या सामन्यात हैदराबादने २७७ धावा केल्या होत्या. यापूर्वी २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध खेळताना २६३ धावांचा डोंगर उभारला होता. आता सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा रेकॉर्ड हैदराबादच्या नावावर आहे. आता हा रेकॉर्ड कोण मोडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग (A successful chase for the highest score)

आयपीएल २०२४ स्पर्धेत खेळताना पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. पंजाबने या हंगामात आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबसमोर जिंकण्यासाठी २६२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पंजाबने ८ चेंडू शिल्लक ठेवून यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. यासह पंजाबने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) रेकॉर्ड मोडून काढला होता. दक्षिण आफ्रिकेने वेस्टइंडीजविरुद्ध (West Indies) खेळताना २५९ धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. 

दोन्ही डावात मिळून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड (Record for most runs scored in both innings combined)

या हंगामात एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डदेखील मोडला गेला. या सामन्यात दोन्ही डावात मिळून ५३९ धावा केल्या होत्या. यापूर्वी एकाच सामन्यात इतक्या धावा कधीच झाल्या नव्हत्या. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना, सनरायझर्स हैदराबादने २० षटकअखेर २८७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने २० षटकअखेर २६२ धावा केल्या होत्या.

सर्वाधिक शतक (Most centuries)

आयपीएल २०२४ स्पर्धेत एकूण १४ शतकं झळकावली गेली. यापूर्वी कुठल्याच हंगामात इतकी शतकं झळकावली गेली नव्हती. २०२३ मध्ये १२, २०२२ मध्ये ८ ,२०१६ मध्ये ७ आणि २००८ मध्ये ६ शतकं झळकावली गेली होती.

सर्वाधिक वेळेस २५० पेक्षा अधिक धावा (Most runs of more than 250)

आयपीएल २०२४ स्पर्धा रेकॉर्ड ब्रेकिंग ठरली. कारण या हंगामात तब्बल १४ वेळेस २५० पेक्षा अधिक धावा कुटल्या गेल्या. यापूर्वी आयपीएलच्या १६ व्या हंगामात केवळ दोन वेळेस २५० पेक्षा अधिक धावा केल्या गेल्या होत्या.


सम्बन्धित सामग्री