पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे बाहेरील मेडिकल वाल्यांची साठे लोटे असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे ससून रूग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. कार्यभार स्वीकारताच त्यांनी ससूनमधील डॉक्टरांची बैठक घेतली. डॉक्टरांनी कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना बाहेरून औषधे आणावयास सांगू नये. रुग्णालयात उपलब्ध असतील तीच औषधे डॉक्टरांनी लिहून द्या, अशी तंबी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.