T20 World Cup 2026 Schedule: पुढील वर्षी म्हणजेचं 2026 च्या टी-20 विश्वचषकाबाबत क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेचा पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एक उपांत्य सामना होणार आहे, तर दुसरा उपांत्य सामना श्रीलंकेतील कोलंबोमध्ये होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Akash Chaudhary: सलग 8 चेंडूत 8 षटकारांचा पराक्रम! भारतीय फलंदाज आकाश चौधरीने रचला जागतिक विक्रम
विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 दरम्यान खेळवला जाईल अशी चर्चा आहे. अहमदाबादमधील हेच स्टेडियम याआधी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे उद्घाटन आणि अंतिम सामन्याचे आयोजन करून चर्चेत आले होते. भारत आणि श्रीलंकेतील एकूण सात ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत. भारतातील सामन्यांसाठी अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांची निवड करण्यात आली आहे. तर श्रीलंकेत पल्लेकेले, दाम्बुला आणि हंबनटोटा यापैकी तीन ठिकाणी सामने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - IPL - WPL Auction: ठरलं तर मग! IPL आणि WPL 2026 साठी खेळांडूंचा लिलाव होणार या तारखांना
दरम्यान, सराव सामन्यांसाठी बंगळुरू हे संभाव्य स्थळ असू शकते, मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आयसीसी पुढील काही दिवसांत संपूर्ण वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या वेळेस 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तुलनेत कमी सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी सुमारे सहा टी-20 सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.