Saturday, February 14, 2026 01:23:11 PM

Gold-Silver Price : गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात मकर संक्रांतीच्या दिवशी मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे बदल

आज मकर संक्रांतीच्या शुभदिनी सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. मकरसंक्रांतीच्या दिवशी सोन्याचे दर वाढले की कमी झाले? यादरम्यान सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावांतील बदल जाणून घ्या..

gold-silver price  गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात मकर संक्रांतीच्या दिवशी मोठी उलथापालथ जाणून घ्या आजचे बदल

आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरच्या हालचाली आणि देशांतर्गत मागणी यांचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरांमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. आज मकर संक्रांतीच्या शुभदिनी सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. मकरसंक्रांतीच्या दिवशी सोन्याचे दर वाढले की कमी झाले? यादरम्यान सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावांतील बदल जाणून घ्या... 

हेही वाचा- Maharashtra Weather Update : 16 ते 19 जानेवारीपर्यंत हवामानात मोठा बदल! चार दिवस 'या' राज्यात पावसाचा अलर्ट जारी
आज देशात 10 ग्रॅमनुसार 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 130,818 तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर 142,710 रुपये इतका आहे. त्याचसोबत 1 किलो चांदीचा दर 274,770 रुपये आणि 10 ग्रॅम चांदीचा दर 2,748 रुपये आहे. दरम्यान शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत ते जाणून घ्या... प्रति 10 ग्रॅमनुसार मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 130,579 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 142,450 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 130,579 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 142,450 रुपये आहे. नागपूरमध्ये    22 कॅरेट सोन्याचा दर 130,579 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 142,450 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये22 कॅरेट सोन्याचा दर 130,579 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 142,450 रुपये आहे.


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या