Wednesday, February 18, 2026 05:22:09 PM

Liquor Smuggling : चक्क महिला करत होत्या रेल्वेतून दारूची तस्करी! हायटेक रॅकेट उद्ध्वस्त; कुठे चालला होता हा प्रकार?

रेल्वेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या दारू तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे, हे रॅकेटअनेक महिलांच्या द्वारे चालवले जात होते.

liquor smuggling  चक्क महिला करत होत्या रेल्वेतून दारूची तस्करी हायटेक रॅकेट उद्ध्वस्त कुठे चालला होता हा प्रकार

Liquor Smuggling by Women's Racket : बिहारच्या जमुई रेल्वे स्थानकावर बुधवारी, 28 जानेवारी 2026 रोजी रेल्वे सुरक्षा दलाने (GRP) एक मोठी कारवाई केली. पाटणा-धनबाद इंटरसिटी एक्सप्रेस जमुई स्थानकावर पोहोचताच, साध्या वेशात तैनात असलेल्या पोलीस पथकाने वेढा घातला. यावेळी दारूने भरलेली बॅग घेऊन उतरणाऱ्या एका महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले, तर तिचे इतर साथीदार गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. या कारवाईसाठी पोलिसांनी विशेष व्यूहरचना आखली होती, ज्यामध्ये महिला जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

धनबादची 'रूपा' अटकेत, 'खुशबू' निघाली सूत्रधार
अटक करण्यात आलेल्या महिलेची ओळख रूपा कुमारी (रा. धनबाद, झारखंड) अशी झाली आहे. पोलीस चौकशीत तिने दिलेल्या माहितीने अधिकारीही चकीत झाले. रूपाने कबुली दिली की, या संपूर्ण रॅकेटची सूत्रधार धनबादची खुशबू देवी असून ती रूपाची नात्याने 'बुआ' म्हणजेच आत्या लागते. ही 'बुआ' गेल्या एका वर्षापासून झारखंड आणि पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात दारू मागवून बिहारच्या जमुई, झाझा आणि गिद्धौर सारख्या भागात पुरवत होती.

हेही वाचा - Crime News : क्रौर्याची परिसीमा! कष्टाने शिकवून पायावर उभं केलं, तिनेच आई-वडिलांना संपवलं; का केला भयंकर गुन्हा?

महिलांचा वापर आणि तस्करीची 'हायटेक' पद्धत
सुरक्षा यंत्रणांना संशय येऊ नये म्हणून या टोळीत अर्धा डझनहून अधिक महिला आणि तरुणींचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक खेप यशस्वीपणे पोहोचवण्यासाठी या महिलांना 2000 ते 5000 रुपये दिले जात होते. जमुईमध्ये दारूची डिलिव्हरी घेण्यासाठी तस्कर अनेकदा ब्लॅक पल्सर आणि ब्लू अपाचे यांसारख्या दुचाकींचा वापर करत असत. या टोळीने रेल्वेच्या प्रवासाला तस्करीचे हक्काचे साधन बनवले होते, जेणेकरून मोठ्या प्रमाणात माल सहज वाहून नेता येईल.

अजित महतोच्या नेटवर्कवर पोलिसांची नजर
रूपा कुमारीने दिलेल्या माहितीनुसार, जमुईमधील मंजबाए गावातील अजित कुमार महतो हा या दारूचा मुख्य रिसीव्हर होता. पोलीस आता खुशबू आणि अजित या दोघांचा शोध घेत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीआरपी प्रभारी मनोज देव यांच्या नेतृत्वाखाली जुली कुमारी, मुस्कान कुमारी आणि प्रेरणा सिंह यांसारख्या महिला जवानांनी या ऑपरेशनमध्ये तांत्रिक देखरेखीचा वापर करून मोठे यश मिळवले आहे. बिहारमधील दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर महिलांचा वापर करून रेल्वेमधून राजरोसपणे केली जाणारी ही तस्करी चिंतेचा विषय बनली आहे.

हेही वाचा - Child Trafficking Racket : आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; नवजात बाळाची सुटका, तिघांना अटक


सम्बन्धित सामग्री