मुंबई : राहुल गांधींविरोधात भाजपानं शुक्रवारी राज्यभर आंदोलनं केले. आरक्षणविरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना आंदोलनाच्या माध्यमातून भाजपाने घेरले. 'काँग्रेस हटाओ, आरक्षण बचाव' चा नारा देत भाजपा राज्यभर आंदोलन करत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे मुंबईत आंदोलन करत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
- राज्यभरात राहुलविरोधात संताप
- राहुल यांच्या वक्तव्याचा निषेध - पंकजा मुंडे
- आरक्षणविरोधी राहुलना मविआचा पाठिंबा ? - पंकजा
- राहुल गांधी आरक्षणविरोधी - आशिष शेलार
- राहुल राज्यघटनेला संपवणार - शेलार
- चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागा - शेलार
- जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - शेलार