Friday, December 13, 2024 10:14:15 AM

BJP announces candidates for Nashik district assem
नाशिक जिल्ह्यात चार आमदारांना भाजपाची पुन्हा उमेदवारी

नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे, नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले, चांदवड मधून राहुल आहेर आणि बागलान मधून दीपक बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे प्रतीक्षेत

नाशिक जिल्ह्यात चार आमदारांना भाजपाची पुन्हा उमेदवारी

नाशिक : भाजपाने नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे, नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले, चांदवड मधून राहुल आहेर आणि बागलान मधून दीपक बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे या यादीत प्रतीक्षेत आहेत, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सीमा हिरे आणि राहुल आहेर यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांकडून विरोध करण्यात आला होता. विशेषतः राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर देखील चांदवड मधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. केदा आहेर यांच्या समर्थनार्थ राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केली होती.

आता राहुल आहेर यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने केदा आहेर यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले जात आहे. नाशिक पश्चिम मधून देखील सीमा हिरे यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यामुळे स्थानिक नेत्यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या स्थितीचा परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo