Friday, December 13, 2024 11:36:16 AM

Devyani Farande
देवयानी फरांदे सागर बंगल्यावर

भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत नाशिकच्या देवयानी फरांदे यांचे उमेदवार म्हणून नाव नव्हते.

देवयानी फरांदे सागर बंगल्यावर

मुंबई : भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत नाशिकच्या देवयानी फरांदे यांचे उमेदवार म्हणून नाव नव्हते. यामुळे नाराज झालेल्या फरांदे यांनी यादी जाहीर होऊन २४ तास होण्याआधीच थेट सागर बंगला गाठला आहे. सागर बंगल्यावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून स्वतःची बाजू मांडण्याचा निर्णय देवयानी फरांदे यांनी घेतला आहे. 

कोण आहेत देवयानी फरांदे ?

मागील ३० वर्षांपासून भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्या 
नाशिक महापालिकेत १९९७ ते २०१४ दरम्यान तीन वेळा नगरसेविका
नाशिक महापालिकेत २००९ ते २०१२ दरम्यान उपमहापौर
भाजपात २००४ ते २०१३ दरम्यान महिला मोर्चा प्रदेश चिटणीस
महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या इतर मागासवर्गीय समिती व उपविधान समिती सदस्या
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड
अभ्यासू आणि परखड नेतृत्व


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo