Thursday, September 12, 2024 10:37:14 AM

Waqf Bill
जगदम्बिका पाल संयुक्त संसदीय चिकित्सा समितीचे अध्यक्ष

वक्फ सुधारणा विधेयक २०२४ च्या मसुद्याचा फेरविचार करण्यासाठी संयुक्त संसदीय चिकित्सा समिती स्थापन करण्यात आली आहे.

जगदम्बिका पाल संयुक्त संसदीय चिकित्सा समितीचे अध्यक्ष

नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयक २०२४ च्या मसुद्याचा फेरविचार करण्यासाठी संयुक्त संसदीय चिकित्सा समिती स्थापन करण्यात आली आहे. या ३१ सदस्यांच्या समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे लोकसभा खासदार आणि ज्येष्ठ संसद सदस्य जगदम्बिका पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त संसदीय चिकित्सा समितीत लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १० खासदार आहेत. मसुद्यावर फेरविचार करण्यासाठी संयुक्त संसदीय चिकित्सा समितीकडे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरपर्यंतचा कालावधी आहे. समिती फेरविचार करुन त्यांचा अहवाल दिलेल्या मुदतीत लोकसभेला सादर करेल. या अहवालाआधारे विधेयक सुधारित मसुद्यासह लोकसभेत मंजुरीसाठी सादर केले जाईल. याआधी ८ ऑगस्ट रोजी वक्फ सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत सादर झाले. सभागृहाच्या सहमतीने विधेयकाचा मसुदा फेरविचार करण्यासाठी संयुक्त संसदीय चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला. यानंतर ३१ सदस्यांची स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी जगदम्बिका पाल यांची नियुक्ती करण्यात आली.

                 

सम्बन्धित सामग्री