मुंबई : भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी पार पडले. या अधिवेशनातून अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम भाजपा कार्यकर्त्यांनी केलंय. तर भाजपाशी द्रोह करणाऱ्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम कार्यकर्त्यांनी केल्याचा घणाघाती प्रहार केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शिर्डी येथील महाअधिवेशनात केला आहे.
तुम्ही पवारांचं दगाफटक्याचं राजकारण दफन केलं. पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडलं असं म्हणत त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंना तुम्ही त्यांची जागा दाखवली अस म्हणत उद्धव ठाकरेंवर त्यांनी जहरी टीका केली. महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्याचं काम तुम्ही केलंत केलं असे म्हणत शाह यांनी फडणवीस सरकारचे स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचं श्रेय शांहांनी देवेंद्र फडणवीसांना देत त्यांचे कौतुक केलं. निवडणुका देशाचं राजकारण बदलतात. महाराष्ट्रातील यशाचे शिल्पकार भाजपाचे कार्यकर्ते आहेत असे सांगत त्यांनी आगामी काळात प्रत्येक निवडणुका भाजपाच जिंकेल असा संकल्प केला.
हेही वाचा : भाजपा अधिवेशनातून शाह यांचा पवार आणि ठाकरेंवर निशाणा
राज्यात बहुमताचं सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या महाअधिवेशनात भाजपा नेत्यांनी आगामी निवडणुकांचे बिगूल वाजवलं आहे. येत्या काही महिन्यात पालिक निवडणुका होणार असून त्यांच्या तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल
भाजपाचे संघटन पर्व सुरू असून त्यामाध्यमातून प्रत्येक मंत्र्यांनी खेडेगावात जावून काम करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत.
बावनकुळे यांचे मंत्र्यांना निर्देश
भाजपाचे 'खेड्याकडे चला' अभियान
पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी खेड्यात जावे
महिन्यातून एकदा खेड्यात मुक्काम करावा
स्थानिक लोकांशी संवाद साधावा
खेड्यातील माणसांच्या समस्या समजून घ्याव्यात
त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खेड्यात जावेच लागेल
पक्ष संघटनेशी संबंधित कामांसाठी एक स्वतंत्र ओएसडी नेमावा
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचं शिर्डीतील महाअधिवेशन महत्वाचं ठरलं आहे. या अधिवेशनाची टॅग लाईन 'श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी' अशी होती. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा सर्वांर्धानं तयारीला लागली असून विरोधकांचं पानिपत करण्याचं ध्येय गाठण्याचा निर्धार भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.