Sunday, May 10, 2026 07:28:54 PM

Black Magic in Cricket: IPL सामन्यादरम्यान काळी जादू? SRH च्या चाहत्याने लिंबू फिरवलं अन् CSK चा खेळाडू झाला बाद; पाहा व्हिडीओ

सनरायझर्स हैद्राबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्याने चक्क 'काळी जादू' केल्याचा दावा केला जात आहे.

black magic in cricket ipl सामन्यादरम्यान काळी जादू srh च्या चाहत्याने लिंबू फिरवलं अन् csk चा खेळाडू झाला बाद पाहा व्हिडीओ

Black Magic in Cricket: आयपीएलच्या मैदानात आतापर्यंत आपण फलंदाजांची फटकेबाजी आणि गोलंदाजांची फिरकी पाहिली आहे, पण सोशल मीडियावर सध्या एका 'वेगळ्याच फिरकीची' चर्चा रंगली आहे. सनरायझर्स हैद्राबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्याने चक्क 'काळी जादू' केल्याचा दावा केला जात आहे. हातात लिंबू घेऊन त्याने केलेल्या एका कृतीनंतर लगेच विकेट पडल्याने क्रिकेटप्रेमी अवाक झाले आहेत.

नेमकं काय घडलं? 'परफेक्ट टायमिंग'चा थरार 
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक हैद्राबादचा चाहता स्टँड्समध्ये बसलेला दिसत आहे. त्याच्या हातात एक लिंबू असून तो काहीतरी पुटपुटत ते हवेत विचित्र पद्धतीने फिरवताना दिसतो. आश्चर्याची बाब म्हणजे, जसा त्याने हा 'टोटका' पूर्ण केला, तसाच पुढच्या चेंडूवर चेन्नईचा फलंदाज बाद झाला. हा योगायोग इतका अचूक होता की, स्टेडियममधील प्रेक्षकांसह नेटकऱ्यांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

काळ्या जादूची चर्चा
हा व्हिडिओ @GemsOfCricket या एक्स (ट्विटर) हँडलवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनी या घटनेला आयपीएलमधील 'सर्वात फनी क्षण' म्हटले आहे. एका यूजरने म्हटलं आहे की, "आता DRS ची गरज नाही, 'LRS' (Lemon Review System) आणा!" तसेच दुसऱ्या एकाने म्हटलं आहे, "हा आयपीएल सामना आहे की तांत्रिक-मांत्रिकांची परिषद?"

हेही वाचा - IPL 2026 : KKR साठी 'करो या मरो' स्थिती! सलग 5 पराभवानंतर कोलकातावर टांगती तलवार

योगायोग की अंधश्रद्धा?
मैदानावरील विकेट पडणे हा निव्वळ योगायोग असला तरी, या चाहत्याच्या टायमिंगने सोशल मीडियावर मीम्सचा पूर आणला आहे. काहींनी याला 'अंधश्रद्धा' म्हटले असले तरी, बहुतांश चाहत्यांनी हा व्हिडिओ केवळ करमणूक म्हणून घेतला आहे. क्रिकेटच्या वेडापायी चाहते काय करू शकतात, याचे हे एक गमतीशीर उदाहरण ठरले आहे. 


सम्बन्धित सामग्री