Wednesday, December 11, 2024 12:23:40 PM

Pakistan
पाकिस्तानमध्ये सैनिकांना लक्ष्य करुन आत्मघाती बॉम्बस्फोट

पाकिस्तानच्या क्वेट्टा रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्र असलेल्या भागात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात २५ जणांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानमध्ये सैनिकांना लक्ष्य करुन आत्मघाती बॉम्बस्फोट

क्वेट्टा : पाकिस्तानच्या क्वेट्टा रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्र असलेल्या भागात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात २५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाकिस्तानचे १४ सैनिक आहेत. स्फोटात ठार झालेले सैनिक रेल्वेने क्वेट्टा येथून पेशावरला जाणार होते. जाफर एक्सप्रेस फलाटावर येण्याच्या थोडा वेळ आधी स्फोट झाला. स्फोट झाल्यावर थोड्या वेळाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या स्फोटाची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले. पाकिस्तानच्या सैनिकांना लक्ष्य करुन बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने आत्मघाती बॉम्बस्फोट केला होता. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo