Monday, November 17, 2025 06:26:06 AM

Arbaaz Khan Baby : अरबाज खान 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा बनला पिता? पत्नी शूरा खानने गोंडस 'मुलीला' जन्म दिल्याची चर्चा

अरबाज खानने काही दिवसांपूर्वीच पत्नी शूरा खानसाठी एका ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. या सोहळ्यात सलमान खानसह कुटुंबातील सर्व सदस्य आणि अनेक जवळचे मित्र उपस्थित होते.

arbaaz khan baby  अरबाज खान 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा बनला पिता पत्नी शूरा खानने गोंडस मुलीला जन्म दिल्याची चर्चा

Arbaaz Khan Sshura Khan Baby Girl: अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाज खान वयाच्या 58 व्या वर्षी दुसऱ्यांदा पिता बनला आहे. त्याची पत्नी शूरा खानने मुंबईतील एका रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. रविवारी 5 ऑक्टोबर रोजी ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर खान कुटुंबात सध्या उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. सलीम खान यांच्या कुटुंबाला अनेक वर्षांनंतर हा नवा आनंद मिळाला आहे.

मुलीचा जन्म
अरबाज खानची पत्नी शूरा खानला शनिवारी सकाळी खार परिसरातील पीडी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शूरा गर्भवती आहे आणि अरबाज पुन्हा एकदा पिता होणार आहे, ही बातमी आल्यापासून खान कुटुंबात बाळाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर 5 ऑक्टोबर रोजी ही प्रतीक्षा संपली आणि घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले. अरबाज खान दुसऱ्यांदा पिता बनला आहे. त्याची पहिली पत्नी मलाइका अरोरा हिच्यापासून त्याला अरहान खान नावाचा एक मुलगा आहे.

हेही वाचा - Maharashtra Flood Relief: सयाजी शिंदेंचा ऐतिहासिक पुढाकार! सखाराम बाइंडर’ नाटकातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

ग्रँड बेबी शॉवर आणि प्रेम कहाणी
अरबाज खानने काही दिवसांपूर्वीच पत्नी शूरा खानसाठी एका ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. या सोहळ्यात सलमान खानसह कुटुंबातील सर्व सदस्य आणि अनेक जवळचे मित्र उपस्थित होते. अरबाज खानचा मलाइका अरोरासोबत 2018 मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर अरबाजच्या आयुष्यात शूराची एन्ट्री झाली. शूरा ही मेकअप आर्टिस्ट आहे. काही काळ डेटिंग केल्यानंतर 24 डिसेंबर 2023 ला त्यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती आणि आता ते आई-वडील बनल्याचे समोर येत आहे. मात्र, अद्याप अरबाज आणि शूरा यांच्याकडून याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अरबाज आणि शूरामधील वयाचा फरक
अरबाज खान आणि शूरा खान यांच्यातील वयाच्या फरकामुळे त्यांच्याबद्दल अनेकदा चर्चा झाली आहे. अरबाज खान 4 ऑगस्टला  नुकताच 58 वर्षांचा झाला आहे. तर, शूरा खान जुलैमध्ये 43 वर्षांची झाली आहे. म्हणजेच दोघांमध्ये सुमारे 15 वर्षांचे अंतर आहे. मात्र, प्रेमात या गोष्टी महत्त्वाच्या नसतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

हेही वाचा - Sandhya Shantaram: 'पिंजरा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


सम्बन्धित सामग्री