कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून कर्जतच्या जागेवर दावा केला जात आहे.
सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते २८८ जागाही मागतील असा टोला शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी लगावला आहे. महायुतीचा निर्णय महायुतीतील नेते घेतील. राष्ट्रवादीने किती जागा लढवाव्या हा त्यांचा प्रश्न आहे. पण सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते २८८ जागाही मागतील असे थोरवे म्हणाले.