Tuesday, November 18, 2025 09:35:33 PM

Python Attack Video : अजगराच्या विळख्यात हरणाचं पाडस, महिलेने असं काय केलं की शिकारीच पळाला

एका महिलेने अजगराच्या विळख्यात सापडलेल्या हरणाचा जीव धाडसाने वाचवला. हा थरारक प्रसंग आणि मानवी दयाळूपणाचा नमुना दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

python attack video  अजगराच्या विळख्यात हरणाचं पाडस महिलेने असं काय केलं की शिकारीच पळाला

Viral Video: जंगलातील जीवन नेहमीच अनिश्चिततेने भरलेले असते. शिकारी आणि शिकार यांच्या संघर्षात बहुतेक वेळा शेवट शिकाऱ्याच्याच विजयाने होतो. मात्र कधी कधी निसर्गात असेही प्रसंग घडतात जे मानवी दयाळूपणावर आणि धैर्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे; ज्यात एका महिलेने अजगराच्या विळख्यात सापडलेल्या हरणाचा जीव वाचवून सर्वांचे मन जिंकले आहे.

एका रस्त्याच्या कडेला हा हृदयद्रावक प्रसंग घडला. व्हिडिओमध्ये दिसते की, एक भला मोठा अजगर एका निरागस हरणाला आपल्या जबर विळख्यात घट्ट पकडतो. हरणाचे प्राण कंठाशी आलेले असतात, पण त्याच वेळी एका महिलेचे लक्ष त्या दिशेने जाते. ती महिला क्षणाचाही विलंब न लावता आपल्या कारमधून उतरते आणि हातात काठी घेऊन त्या अजगराकडे धाव घेते.

हेही वाचा: Cat and Snake Fight For Rat : 'कशी नशीबानं थट्टा आज मांडली..', शिकार मिळवण्यासाठी मांजर आणि सापाचं भांडण; मग उंदीर कुणाचा? ..माणसाचा...

महिलेने अजगराला हरणावरून हटवण्यासाठी काठीने जोरजोरात मारायला सुरुवात केली. सुरुवातीला अजगर काही पावले मागे सरकतो, पण नंतर तोच त्या महिलेकडे झेप घेतो. एक क्षणभर सगळं थरारक होतं; पण ती महिला खचली नाही. आपल्या जिवाचा धोका पत्करून तिने अजगराला पळवून लावले आणि शेवटी त्या हरणाचा जीव वाचवण्यात यश मिळवले.

या घटनेचा शेवट जितका थरारक तितकाच हृदयस्पर्शीही आहे. वाचल्यानंतर ते हरण भीतीने थरथरत महिलेच्या जवळ गेले आणि काही काळ तिच्याजवळच राहिले. महिलेनं त्याला प्रेमाने घरी आणले, जखमांवर उपचार केले आणि नंतर त्या हरणाला आपल्या घरचाच एक सदस्य बनवले. आता ते हरण तिच्या कुटुंबासोबतच राहते आणि सोशल मीडियावरही या ‘मानवता आणि दयाळूपणाच्या कहाणी’ची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: Viral: दिल्लीतील कंपनीचा अनोखा निर्णय, दिवाळी साजरी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नऊ दिवस सुट्टी

हा व्हिडिओ X (म्हणजेच ट्विटर) वर @NemanjicZoran या यूजरने शेअर केला असून, आतापर्यंत 1 लाख 47 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.


दोन हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक करून आपला प्रतिसाद नोंदवला आहे. अनेक यूजर्सनी महिलेचं धाडस आणि माणुसकीचं उदाहरण म्हणून कौतुक केलं आहे. एका यूजरने कमेंट केली 'निसर्गातही न्याय असतो!' तर दुसऱ्याने लिहिले 'हे हरण अतिशय भाग्यवान आहे; अजगराच्या तावडीतून सुटणे जवळपास अशक्य असते.'

हा व्हिडिओ पाहून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते जंगलातही करुणा आणि माणुसकीची शक्ती सर्वात मोठी असते. जीव घेणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा अधिक महान असतो, हे या महिलेने सिद्ध करून दाखवले आहे.


सम्बन्धित सामग्री