Sunday, May 10, 2026 08:31:40 PM

Job Offer : एअरलाईन्सची भन्नाट ऑफर! पायलट्सना मिळेल 95 लाखांचं पॅकेज; पण विमान हवेत उडवण्यासाठी नाही, तर...

या एअरलाईन्स कंपनीने एका अशा पदासाठी भरती सुरू केली आहे, जिथे विमान उडवण्याची गरजच नाही. फक्त विमान जमिनीवरून म्हणजेच, विमानतळाच्या आत धावपट्टीवरून चालवण्याची ही नोकरी आहे.

job offer  एअरलाईन्सची भन्नाट ऑफर पायलट्सना मिळेल 95 लाखांचं पॅकेज पण विमान हवेत उडवण्यासाठी नाही तर

Taxi Pilot Job Offer : पायलट म्हटले की डोळ्यांसमोर येते ती विमान आकाशात उडवणारी व्यक्ती.. आपल्यापैकी बहुतेकांच्या डोक्यात हीच संकल्पना रुजलेली असते. पण एअरलाईन्स कंपनीने एका अशा पदासाठी भरती सुरू केली आहे, जिथे विमान उडवण्याची गरजच नाही. फक्त विमान जमिनीवरून म्हणजेच, विमानतळाच्या आत धावपट्टीवरून चालवण्यासाठी तब्बल 95 लाखांचं पॅकेज या कंपनीने जाहीर केलं आहे. अशा प्रकारच्या जॉब प्रोफाईलला काय म्हणतात ठाऊक आहे? ..टॅक्सी पायलट!

शिकागोच्या ओ'हारे इंटरनॅशनल एअरपोर्ट (Chicago O'Hare International Airport) वर ब्रिटिश एअरवेज कंपनी 'टॅक्सी पायलट्स'ची नियुक्ती करत आहे. या कामासाठी वर्षाला 1,00,000 डॉलर म्हणजेच सुमारे 95 लाख रुपये पगार दिला जाणार आहे. या पायलट्सचे मुख्य काम केवळ धावपट्टी (Runway) आणि टर्मिनल यांच्या दरम्यान विमान चालवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे असेल.

या पदाची गरज का भासली?
अमेरिकेतल्या शिकागो विमानतळावरील गुंतागुंतीच्या ऑपरेशनमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची काही प्रमुख कारणे अशी आहेत..
- ब्रिटीश एअरवेजची विमाने टर्मिनल 5 वर उतरतात, जिथे कस्टम आणि इमिग्रेशनची सुविधा आहे.
- परंतु, ही विमाने तिथून उड्डाण करत नाहीत. त्यांना टेक-ऑफ करता टर्मिनल 3 वर यावे लागते. तिथून ही विमाने उड्डाण करतात. याच ठिकाणाहून अमेरिकन एअरलाईन्सची देशांतर्गत उड्डाणे चालतात.
- ब्रिटीश एअरवेज आणि अमेरिकन एअरलाईन्स यांच्यातील भागीदारीमुळे प्रवाशांच्या सोयीसाठी टर्मिनल 5 वर उतरलेली विमाने टर्मिनल 3 वर नेणे आवश्यक असते.
- यामुळे प्रवाशांचे पुढचे कनेक्शन मिस होण्याची भीती कमी होते आणि एअरलाईनचा वक्तशीरपणा सुधारतो.

हेही वाचा - BPCL Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; BPCL मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी पदांसाठी भरती सुरू; पाहा वयोमर्यादा आणि पात्रता

जबाबदाऱ्या आणि आव्हाने
हे काम ऐकायला सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते अत्यंत जबाबदारीचे आहे. शिकागो विमानतळ हे जगातील सर्वात गजबजलेल्या विमानतळांपैकी एक आहे. येथील गुंतागुंतीच्या टॅक्सी-वे नेटवर्कवर बोईंग 777 आणि बोईंग 787 ड्रीमलाइनर सारख्या महाकाय विमानांना हाताळणे सोपे नसते. या नोकरीतील काही प्रमुख जबाबदाऱ्या अशा असतील:
- विमान टॅक्सी करण्यापूर्वी सर्व सुरक्षा तपासणी (Security Checks) पूर्ण करणे.
- ग्राउंड कंट्रोलशी सतत ताळमेळ राखणे.
- खराब हवामान आणि प्रचंड ट्रॅफिक असतानाही विमान सुरक्षितपणे दुसऱ्या टर्मिनलपर्यंत पोहोचवणे.

निवृत्त पायलट्ससाठी उत्तम संधी
ब्रिटीश एअरवेजने 2 मे रोजी या व्हेकन्सीसाठी लिंक्डइनवर पोस्ट शेअर केली होती. आतापर्यंत अनेक लोकांनी अर्जही केले आहेत. ही नोकरी विशेषतः अशा निवृत्त पायलट्ससाठी डिझाइन केली आहे, ज्यांना आता व्यावसायिक उड्डाणे करणे शक्य नाही, पण विमानाशी संबंधित सर्वच बाबींचा प्रदीर्घ अनुभव आहे. यासाठी वैध एअर ट्रान्सपोर्ट पायलट सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. जरी हे पॅकेज वरिष्ठ अमेरिकन पायलट्सच्या तुलनेत कमी असले तरी, कमी तणावाखाली काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

हेही वाचा - Plant Scientist Career: वनस्पती शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहताय? 12 वी नंतर मिळेल संधी, जाणून घ्या कोर्सेसबद्दल संपूर्ण माहिती


सम्बन्धित सामग्री