मुंबई : मुंबई महानगर प्रदेश, सुरत, विशाखापट्टणम आणि वाराणसी या चार महानगर क्षेत्रांचा 'ग्रोथ हब' म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात राबविण्यात येणार आहे. मुंबई महानगराचे सकल देशांतर्गत उत्पादन येत्या पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याबाबत निती आयोगाने केलेल्या शिफारशींची जलद अंमलबजावणी करून मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्याची जबाबदारी सनदी अधिकाऱ्यांवर सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला. मुंबई महानगर प्रदेश, सुरत, विशाखापट्टणम आणि वाराणसी या चार महानगर क्षेत्रांचा 'ग्रोथ हब' म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात राबविण्यात येणार आहे.
ग्रोथ हब समन्वय समितीचे सदस्य कोण ?
- निती आयोगाच्या शिफारशीनुसार समिती गठीत
- मुख्य सचिव सुजाता सौनिक समितीच्या अध्यक्षा
- नगरविकास, उद्योग, पर्यावरण, पर्यटन या विभागांच्या मुख्य सचिवांचा समावेश
- मुंबई महानगर प्रदेशातील जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त समितीचे सदस्य
- एमएमआरडीए, एमआयडीसी, म्हाडा, सिडको,एमआयडीसीचे सीईओंचा समावेश
समितीवरील जबाबदारी काय ?
- निती आयोगाच्या शिफारशींच्या जलद अंमलबजावणीवर देखरेख
- परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यावर लक्ष
- महानगर परिसराचे सकल देशांतर्गत उत्पादन २०३० पर्यंत २६ लाख कोटींवर नेणार
- दुबईच्या धर्तीवर मुंबईत भव्य नॉलेज पार्क उभारण्याची जबाबदारी
- स्टार्टअप व रोजगार क्षमतेला चालना
पर्यटन वाढीसाठी मढ, गोराई, अलिबाग आणि काशिद येथे पर्यटन केंद्र विकसित करणार
अटलसेतूला लागून ५०० एकर जागेवर थीम पार्क