मुंबई : नवीन खरेदी केलेल्या वाहनाला पसंतीचा, आकर्षक वाहन क्रमांक घेण्याकडे अनेकांचा कल असतो. यासाठी वाहन क्रमांक मालिका खुली झाल्यानंतर, व्हीआयपी वाहन क्रमांक अधिकचे शुल्क आकारून दिला जातो. अनेक वाहन मालकांना आकर्षक असलेले किंवा राशींच्या प्रभावानुसारचे वाहन क्रमांक हवे असतात. त्यासाठी ते अधिकचे शुल्क देण्यास ते तयार असतात. सणासुदीच्या काळात वाहन खरेदीच्या संख्येत वाढ झाली असली तरी पसंतीचे वाहन क्रमांक घेण्याचा कल कमी दिसून आला आहे. राज्य सरकारने चारचाकी वाहनांसाठी पाच लाखांपर्यंत तर दुचाकीसाठी एक लाखांपर्यंत शुल्क आकरण्याचा निर्णय घेतल्यामुळे पसंती क्रमांक घेण्याऱ्यांची संख्या कमी झाल्याची माहिती वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.