Thursday, September 12, 2024 10:31:11 AM

Bye Poll
महाराष्ट्रात राज्यसभेची पोटनिवडणूक

राज्यसभेच्या बारा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मतदान ३ सप्टेंबर रोजी होईल. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेची पोटनिवडणूक

मुंबई : राज्यसभेच्या बारा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मतदान ३ सप्टेंबर रोजी होईल. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघे लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांवर आता निवडणूक होणार आहे.

राज्यसभेचे सदस्य असलेले पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले या दोघांनी लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत विजय झाल्यानंतर दोन्ही सदस्यांनी नियमानुसार राजीनामा दिला आणि लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजपाच्या आहेत. यामुळे या जागांवर भाजपा कोणाला उमेदवारी देणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १४ ते २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २६ ऑगस्ट आहे. मतदान आणि मतमोजणी ३ सप्टेंबर रोजी आहे.

Image

Image


सम्बन्धित सामग्री