Tuesday, November 11, 2025 10:48:41 PM

Cat and Snake Fight For Rat : 'कशी नशीबानं थट्टा आज मांडली..', शिकार मिळवण्यासाठी मांजर आणि सापाचं भांडण; मग उंदीर कुणाचा? ..माणसाचा...

कधीकधी असे होते की, एकाच भक्ष्याच्या मागे दोन शिकारी लागतात आणि मग त्या दोघांमध्ये एक वेगळीच झुंज सुरू होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,

catsnake fight for rat  कशी नशीबानं थट्टा आज मांडली शिकार मिळवण्यासाठी मांजर आणि सापाचं भांडण मग उंदीर कुणाचा माणसाचा

Cat and Snake Fight For Rat : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा प्राणी आणि विविध जीवांच्या अद्भुत आणि आश्चर्यचकित करणाऱ्या घटना पाहायला मिळतात. शिकारी प्राणी आपल्या भक्ष्याच्या मागे धावताना किंवा भक्ष्य जीव वाचवण्यासाठी पळताना दिसतात. पण कधीकधी असेही होते की, एकाच भक्ष्याच्या मागे दोन शिकारी लागतात आणि मग त्या दोघांमध्ये एक वेगळीच झुंज सुरू होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एकाच उंदरासाठी (Rat) साप (Snake) आणि मांजर (Cat) यांच्यात जीवघेणी लढाई (Fight) पाहायला मिळत आहे. पण प्रत्यक्षात जे घडलं, ते पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडिओमध्ये नेमके काय आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक साप पिंजऱ्यात बंद असलेल्या उंदराजवळ हळू हळू सरकत पोहोचतो आणि उंदराची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. उंदीरही घाबरून पिंजऱ्याच्या कोपऱ्यात दबकतो. पिंजऱ्यात बंद असल्याने साप त्याला नुकसान पोहोचवू शकत नाही.
मांजरीची एंट्री : त्याचवेळी तिथे एका मांजरीची एंट्री होते. त्या मांजरीची नजरही उंदरावरच असते, पण सापाची नजर आधीच उंदरावर असल्याने दोघांमध्ये जोरदार झुंज सुरू होते.
सापाचा हल्ला : मांजर जशी पिंजऱ्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करते, तसा साप तिच्यावर हल्ला करतो. असे अनेक वेळा घडते. यामुळे मांजरीला नाईलाजाने मागे हटावे लागते आणि शिकार सोडून द्यावी लागते.
उंदराला काही काळापुरते जीवदान: मांजरीला यश न मिळाल्याने आणि सापालाही पिंजऱ्यामुळे उंदराची शिकार करता न आल्याने, उंदराचा जीव काही काळासाठी तरी वाचतो. पण पिंजरा लावणाऱ्या माणसाच्या तावडीतून मात्र, तो वाचणं कठीण आहे. काही काळासाठी उंदराचं नशीब त्याला मृत्यूपासून वाचवत आहे. मात्र, काही वेळानंतर तो काळाचा घास बनणार, हे तर स्पष्टच आहे.

पाहा व्हिडिओ

हेही वाचा - Donald Trump Noble Memes : 'खूपच वाईट झालं हो.. ट्रम्प तात्यांना नोबेल नाही मिळालं..', 'कुणी नोबेल देता का नोबेल..?' सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलेला व्हिडिओ
'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @SaddamUnfiltere नावाच्या आयडीवरून हा धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'एक शिकारी के पीछे दो शिकारी और फिर कुछ अलग ही देखने को मिला' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 1 मिनिट 14 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइक केले असून, त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: एका यूजरने लिहिले आहे की, 'यालाच 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' म्हणतात.' तर दुसऱ्याने मजेशीर अंदाजात म्हटले आहे, 'उंदीरही विचार करत असेल, मी कोणत्या संकटात सापडलो आहे.' आणखी एका यूजरने लिहिले, 'आज मांजरीची शिकार सापाने केली', तर दुसऱ्याने म्हटले, 'आज पहिल्यांदाच उंदीर खुश असेल की, नशीब आहे मी पिंजऱ्यात आहे.' लोकांनी या व्हिडिओला 'निसर्गाचा सर्वात मनोरंजक ड्रामा' असे म्हटले आहे.

हेही वाचा - Divorce Celebration: घटस्फोटानंतर तरुणाने केलं जंगी सेलिब्रेशन, आईने दुधाचा अभिषेक घातला अन्...


सम्बन्धित सामग्री