Thursday, November 13, 2025 07:59:14 AM

CBSE Board Exam 2026: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! CBSE बोर्डाकडून 10वी आणि 12वीचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधीपासून सुरू होणार परीक्षा

10वीच्या परीक्षा 10 मार्च पर्यंत आणि 12वीच्या परीक्षा 9 एप्रिल 2026 पर्यंत चालतील. सर्व परीक्षा सकाळी 10:30 वाजता सुरू होतील आणि विषयानुसार दुपारी 12:30 किंवा 1:30 वाजता संपतील.

cbse board exam 2026 विद्यार्थ्यांनो लक्ष द्या cbse बोर्डाकडून 10वी आणि 12वीचे अंतिम वेळापत्रक जाहीर जाणून घ्या कधीपासून सुरू होणार परीक्षा

CBSE Board Exam 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) वर्ष 2026 साठी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून 10वीच्या परीक्षा 10 मार्च पर्यंत आणि 12वीच्या परीक्षा 9 एप्रिल 2026 पर्यंत चालतील. सर्व परीक्षा सकाळी 10:30 वाजता सुरू होतील आणि विषयानुसार दुपारी 12:30 किंवा 1:30 वाजता संपतील.

हेही वाचा - CSIR UGC NET: यूजीसी नेट परीक्षेसाठी एनटीएकडून अंतिम मुदत जाहीर, उमेदवारांनी वेबसाइटवर अर्ज आजच करावा

या वेळापत्रकानुसार, 10वीच्या विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, इंग्रजी, हिंदी आणि सामाजिक विज्ञान या प्रमुख विषयांच्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील. तर 12वीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी, हिंदी, संगणक विज्ञान, व्यवसाय अभ्यास यांसारख्या विषयांच्या परीक्षा अनुक्रमे फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान होतील. महत्त्वाचे म्हणजे, सीबीएसईने जाहीर केले आहे की 2026 पासून दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, ज्याची अंमलबजावणी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) नुसार केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार असून परीक्षेचा ताणही कमी होईल.

हेही वाचा - Byjus Crisis: NCLT चा मोठा निर्णय! बायजूसची मागणी फेटाळली; 'आकाश'प्रकरणात भागीदारी धोक्यात

बोर्डाने सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान 30 मिनिटे आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांचे अॅडमिट कार्ड आणि शाळेचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी cbse.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
 


सम्बन्धित सामग्री