Mumbai to Kolhapur extra trains : कोल्हापूर ते मुंबई प्रवास रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने मुंबई-कोल्हापूर दरम्यान विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
फेब्रुवारी 2026 मधील सण-उत्सव आणि लग्नसराईमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एकूण 24 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई (CSMT) आणि कोल्हापूर (SCSMT) दरम्यान धावणाऱ्या 6 विशेष फेऱ्या. या गाड्यांमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होईल आणि प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. या विशेष गाड्यांची सेवा आज, 13 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे.
गाडी क्रमांक आणि वेळापत्रक (CSMT ते कोल्हापूर)
मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी गाडी क्रमांक 01029 ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
फेऱ्यांच्या तारखा: ही गाडी 13, 18 आणि 20 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईहून सुटेल.
वेळ: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी 2.30 वाजता सुटून ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 4.20 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
थांबे: दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज या महत्त्वाच्या स्थानकांवर ही गाडी थांबेल.
हेही वाचा - Railway Train Delay: रेल्वेचा ‘लेटलतीफ’ कारभार; तेजस एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना उशिर, प्रवाशांना संताप अनावर
परतीचा प्रवास: कोल्हापूर ते मुंबई वेळापत्रक
कोल्हापूरहून मुंबईला परतणाऱ्या प्रवाशांसाठी गाडी क्रमांक 01030 ही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध असेल.
फेऱ्यांच्या तारखा: ही गाडी 14, 19 आणि 21 फेब्रुवारी 2026 रोजी कोल्हापूरहून सुटेल.
वेळ: छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) वरून दुपारी 3.55 वाजता सुटून ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 4.05 वाजता मुंबईला पोहोचेल.
विशेष नोंद: परतीच्या प्रवासात या गाडीला ठाणे स्थानकावरही थांबा देण्यात आला आहे, जो मुंबई उपनगरातील प्रवाशांसाठी सोयीचा ठरेल.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना
या विशेष गाड्यांचे आरक्षण सध्या सर्व 'पीआरएस' (PRS) काउंटर आणि 'आयआरसीटीसी'च्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू झाले आहे. या गाड्यांना वातानुकूलित (AC), शयनयान (Sleeper) आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात आले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी अधिकृत रेल्वे ॲपवर वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हेही वाचा - Mahashivratri 2026 : कोकणवासीयांना महाशिवरात्रीला गावी जाणं झालं सोपं; 6 विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा, पाहा पूर्ण वेळापत्रक