Chalisa Yog 2026 : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ग्रहांच्या स्थितीमध्ये एक अत्यंत दुर्मिळ बदल पाहायला मिळणार आहे. शुक्र आणि शनि यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून निर्माण होणारा 'चालीसा योग' (Novile Aspect) ज्योतिष शास्त्रात महत्त्वाचा मानला जातो. मात्र, हाच योग काही राशींसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. मानवी जीवनावर या खगोलीय बदलावर आधारित काही परिणाम होऊ शकतात.
काय आहे हा 'चालीसा योग'?
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा शुक्र आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांपासून नेमके 40 अंशावर असतात, तेव्हा 'चालीसा योग' निर्माण होतो. इंग्रजीत याला 'Novile Aspect' असे म्हणतात. शुक्र आणि शनि एकमेकांचे मित्र ग्रह असले तरी, कुंडलीतील त्यांच्या स्थानानुसार हा योग कधी सुख-समृद्धी देतो, तर कधी कठीण आव्हाने उभी करतो. 1 फेब्रुवारी 2026 पासून या योगाचा प्रभाव प्रकर्षाने जाणवणार असून, काही राशींना संयम आणि शिस्त पाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चालीसा योगाचा सकारात्मक पैलू
हा योग जरी आव्हानात्मक असला, तरी तो मनुष्याला संयम, शिस्त आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व शिकवतो. ज्या राशींना याचा फटका बसणार आहे, त्यांनी या काळात विवेकबुद्धीने निर्णय घेतल्यास भविष्यात मोठे यश मिळवू शकतात. हा काळ केवळ सावध राहण्याचा असून, ग्रहांच्या या हालचालीमुळे निर्माण होणारा हा प्रभाव तात्पुरता आहे.
मेष रास (Aries): आर्थिक नुकसान आणि प्रवासात धोका
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा योग बाराव्या भावात (व्यय स्थान) तयार होत आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावेत आणि पैशांचे व्यवहार करताना अत्यंत विश्वासू व्यक्तीचीच मदत घ्यावी. तसेच, या काळात दूरचे प्रवास करणे टाळावे. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू किंवा सामान चोरीला जाण्याची भीती आहे.
उपाय: संकट टाळण्यासाठी नियमितपणे 'हनुमान चालीसा'चे पठण करणे लाभदायक ठरेल.
हेही वाचा - Sindhudurg: मंदिर नाही, मूर्ती नाही तरी हजारो भाविक श्रद्धेने येतात; मानसीश्वर जत्रेचं रहस्य काय?
सिंह रास (Leo): सामाजिक प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता
सिंह राशीचा स्वामी सूर्य असून शुक्र आणि शनि हे सूर्याचे शत्रू ग्रह मानले जातात. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक तणावाचा ठरू शकतो. तुमची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा किंवा प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होऊ शकतो. चुकीच्या लोकांच्या संगतीपासून दूर राहा. मेहनतीचे फळ विलंबाने मिळाल्याने नैराश्य येऊ शकते. उधार किंवा कर्ज घेणे-देणे पूर्णपणे टाळा.
उपाय: मानसिक शांततेसाठी दररोज सूर्यदेवाची उपासना करा आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करा.
वृश्चिक रास (Scorpio): आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी तणाव
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ संभ्रमाचा असू शकतो. कामातून लक्ष भरकटल्यामुळे चुका होण्याची शक्यता जास्त आहे. डोळे आणि घशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या विरोधात असू शकते. कोणत्याही अपरिचित व्यक्तीवर आर्थिक विश्वास ठेवू नका.
उपाय: मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी भगवान शंकराची आराधना करा आणि नियमित योग व ध्यान (Meditation) करा.
हेही वाचा - Badrinath Kedarnath Temple : धार्मिक परंपरा जपण्यासाठी मंदिर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय; बद्रीनाथ आणि केदारनाथ धाममध्ये फक्त 'हिंदूंनाच' प्रवेश
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)